Uncategorized

वेळापूर पोलिस अधिकारी यांच्या मध्यस्थीने तांदुळवाडी मधील ३५ वर्षापासून बंद असलेला रस्ता चालू.


वेळापूर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील तांदुळवाडी-खोरेवस्ती हा रस्ता गेली ३५ वर्षे पिलीव पंढरपूर रोडपासून बंद होता. प्रत्येक निवडणुकीत हा रस्ता प्रचाराचा प्रमुख मुद्दा असायचा आणि निवडणूक झाली की पुढारी परत त्यावर न बोलता दुसरी निवडणूक आली की, परत तेच आश्वासन, या सर्वाना कंटाळून शेतकरी यांनीच खोरेवस्ती रोडवरील सदर रस्ता हा नकाशातील आहे तो खुला करावा, यासाठी तहसीलदार माळशिरस यांच्याकडे कायदेशीरपणे अॅड. रणजित माने देशमुख यांच्यामार्फत रस्ता मागणी अर्ज दाखल केला होता. त्याचा निकालही शेतकरी यांच्या सारखा लागला होता. तीन चार महिने सामजंसपणे रस्ता खुला करण्यासाठी भरपूर प्रयन्त झाले तरीही यात कोणीही लक्ष घालेना म्हणून संबंधित प्लाॅटधारकांना रोडवरील शेतकरी यांनी अनेकदा विनवण्या करून रस्ता मागितला‌. परंतु, या सर्वांचे एकमत होऊन रस्ता काही चालू करता आला नाही. शेवटी आम्ही पोलिस अधिकारी यांची मदत घेऊन रस्ता खुला करण्यासाठी वेळापूर पोलिस स्टेशनला येऊन श्री‌‌. बागाव साहेब आणि ठाणे अंमलदार सहा. पोलिस उपनिरीक्षक रेगुडे साहेब यांच्याकडे हा विषय मांडला. सर्व कायदेशीर कागदपत्रे सादर केली. मग त्यांनी सुवर्णमध्य काढून सकारात्मक निर्णय घ्यायला शेतकरी आणि प्लाॅटधारकांना लावला.

रस्ता करण्यासाठी प्रमुख सहकार्य लाभले ते म्हणजे श्री. धनाजी चव्हाण, दत्ता कदम, सज्जन कदम, कल्याण गायकवाड, बापू बाबर, तात्यासो सुरवसे तसेच प्रशांत निंबाळकर आणि मिलिंद शिंदे यांचे त्याचबरोबर पोलिस अधिकारी वेळापूर श्री. बागाव साहेब आणि ठाणे अंमलदार श्री. सहा. पोलिस उपनिरीक्षक रेगुडे साहेब यांनी कायदेशीररीत्या मध्यस्थी करून दोघांनाही विश्वासात घेऊन बावीस फुट रूंदीचा पिलीव पंढरपूर रोडपासून बंद असलेला रस्ता चालू करून दिला.

त्याबद्दल समस्त खोरेवस्ती भागातील शेतकरी यांच्यावतीने पोलिस अधिकारी श्री. बागाव साहेब आणि ठाणे अंमलदार श्री. सहा. पोलिस उपनिरीक्षक रेगुडे साहेब तसेच पोलिस नाईक श्री. राजगे यांचा सत्कार करून अभिनंदन केले व प्लाॅटधारकांचे आभार मानले.

पोलिस अधिकारी जर बागाव साहेब आणि ठाणे अंमलदार श्री‌. सहा. पोलिस उपनिरीक्षक रेगुडे साहेब यांच्यासारखे लाभले तर दोघांनाही समान न्याय देऊन निश्चितपणे गावातील तंटे कोर्टात न जाता सहजपणे मिटवता येतील, त्यासाठी दोन्ही बाजूंनी एक पाऊल मागे पुढे सरले पाहिजे. यावेळी हणमंत धनवडे, महादेव धनवडे, बाळासाहेब भोसले, बाळासाहेब राजगुडे, किसन शिंदे, भास्कर केदार, प्रल्हाद भोसले, दशरथ मिले, जोतिराम शिंदे, अमोल राऊत आदि उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button