ताज्या बातम्यासामाजिक

वेळापूर येथील स्व. संजय बनकर यांच्या मातोश्री व भावजय यांचा विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न….

विष प्राशन करण्याच्या पाठीमागील मुख्य कारण शोधून पीडित सासू-सुनांना पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळावा नातेवाईक व ग्रामस्थांकडून मागणी…

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार व उद्योजक संजय पांडुरंग बनकर यांचे दोन वर्षांपूर्वी अकाली दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या मातोश्री व भावजय यांनी चार दिवसापूर्वी विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना नातेवाईक यांनी अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ऍडमिट केलेले होते. विष प्राशन करण्याच्या पाठीमागील मुख्य कारण शोधून पीडित सासु-सुनांना पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळावा अशी मागणी नातेवाईक व ग्रामस्थांकडून होत आहे.

प्रतिकूल परिस्थितीत संजय व विजय यांनी रात्रंदिवस शेतीमध्ये काबाडकष्ट केलेले आहे. त्यांनी इको बोर्ड वेळापूर येथे बगॅस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर घेऊन इको बोर्ड कंपनीमध्ये उद्योग व्यवसाय केलेला आहे‌ जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणा यामुळे शेती व उद्योग व्यवसाय यामध्ये राम-लक्ष्मणासारख्या असणाऱ्या संजय व विजय दोघा भावांना यश मिळालेले आहे. दिवसेंदिवस आर्थिक प्रगती सुधारत गेली. त्यांनी घर, जागा, जमिनी खरेदी केलेल्या आहेत. विजय यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेला होता. घरातील जबाबदारी संजय यांच्यावर होती.

मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याशी आर्थिक व्यवहार केलेले होते‌, पण त्यांच्याकडून परतफेड झालेली नव्हती. घर, जागा, जमीन खरेदी केलेल्या होत्या. परंतु, काही ठिकाणी अडचणी होत्या. अशा गोष्टींमध्ये संजय नेहमी ताण-तणावांमध्ये असत. नातेवाईक व मित्रपरिवार यांच्या आर्थिक व्यवहाराची अडचण वाढत गेलेली असल्याने संजय बनकर यांनी आपले जीवन संपवलेले होते. घरामधील दोन तरुण मुले मृत पावलेली असल्याने घरामध्ये आई-वडील व दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. आर्थिक व्यवहार होत असताना घरांमध्ये चर्चा होत होती. संजय यांच्या पश्चात आई व भावजय यांनी मित्रपरिवार व नातेवाईक यांचे आर्थिक व्यवहाराविषयी चर्चा करण्यासाठी वारंवार हेलपाटे सुरू होते. नातेवाईक व मित्रपरिवार यांनी आमच्याकडे पैसे संजयचे नाहीत उलट संजयकडेच पैसे असल्याचे सांगितले. अशा अनेक घटनांनी संजय बनकर यांच्या मातोश्री व भावजय यांनी विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळापूर परिसरामध्ये बातमी वाऱ्यासारखी पसरली. विष प्राशन करण्याच्या पाठीमागील मुख्य कारण शोधून पीडित सासू सुनांना पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळावा, अशी नातेवाईक व ग्रामस्थांची मागणी होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort