Uncategorized

वेळापूर येथे शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन….

प्रथम येणाऱ्यास १ लाख रु. रोख व स्वयं उदय केसरी २०२३ ट्रॉफीने सन्मानित करण्यात येणार.

वेळापूर (बारामती झटका )

शिवरत्न उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ वा. वेळापूर येथील महादेव देवालय ट्रस्ट वेळापूर, ता. माळशिरस येथे युवा नेते स्वप्निलभैय्या संपतराव माने देशमुख व शिवतिसिंह मोहिते पाटील मित्र समूह माळशिरस तालुका यांच्यावतीने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक 1 लाख रु. बक्षीस, द्वितीय क्रमांक ७१ हजार रू., तृतीय क्रमांक ४१ हजार रू., चौथा क्रमांक ३१ हजार रू., पाचवा क्रमांक २१ हजार रू., सहावा क्रमांक ११ हजार रू. व सर्व विजेत्यांना बक्षीसाबरोबर स्वयं उदय केसरी २०२३ ने सन्मानित करण्यात येणार आहे. नियम व अटी सर्वांना लागू राहतील. प्रवेश फी एक हजार रुपये राहील. सदर बैलगाडा शर्यतीचे समालोचन सुनील मोरे पेडगावकर करणार आहेत.

तरी सर्व बैलगाडा चालक-मालक यांनी पैलवान बंडू चव्हाण 98 60 47 59 42, जीवन जाधव 75 07 54 04 27 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवतेसिंह मोहिते पाटील मित्र समूह माळशिरस तालुका व आयोजक स्वप्नील भैया संपतराव माने देशमुख यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort