वै.ह.भ.प. हनुमंत (भाऊ) मिले यांची प्रथम पुण्यतिथी तांदुळवाडी येथे विविध कार्यक्रमाने साजरी
वाघोली (बारामती झटका)
दि. 17/12/2022 तांदुळवाडी येथील वारकरी सांप्रदायातील जुन्या पिढीतील वासकर फडातील मृदुंगमणी वै. हनुमंतभाऊ मिले यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त तांदुळवाडी येथे विविध कार्यक्रमाद्वारे त्यांना विविध मान्यवरांचे हस्ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यात प्रथम वर्षश्राद्धाची पूजा आटोपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, आप्पासाहेब वासकर महाराज व हनुमंत मिले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर नाशिक येथील ख्यातनाम वारकरी सांप्रदायाचे संगीत गायक पंडित शंकर वैरागकर (गुरुजी) व त्यांचे शिष्य यांच्या मार्फत विविध अभंगाचे शास्त्रीय संगीत रचनेद्वारे सादरीकरण करण्यात आले. वैराग गुरुजी यांनी अभंगाद्वारे सध्याचे जीवन प्रत्येकाने कसे आचरण करावे, यांची विविध उदाहरणे, गोष्टी सांगून कार्यक्रमात रंगत भरली. व उपस्थित महिला वर्ग वारकरी व ग्रामस्थांचे प्रबोधन केले व सर्वांना विठ्ठल भक्तीचे आव्हान केले.

त्यानंतर पुणे येथील सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी अभंग गवळणी गाऊन हनुमंत भाऊ मिले यांना आदरांजली वाहिली. सदर कार्यक्रमास माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील सह शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. कल्याणरावजी काळे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे श्री. प्रकाशबापू पाटील, मराठा सेवा संघ पुणे प्रदेशाध्यक्ष श्री. उत्तमराव माने शेंडगे, विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक श्री. कालिदास पाटील, वाघोली गावचे ज्येष्ठ नेते श्री, वसंत मिसाळ, पटवर्धन कुरोलीचे ज्येष्ठ नेते मधुकर (आबा) नाईकनवरे, मिले परिवाराचे सर्व पाहुणे, गावातील वारकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. नागेश काकडे, डॉ. राहुल मिले, सुरेश कुंभार, नामदेव मिले व परिवारातील सदस्य यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पडला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng