शासन दरबारी जे सहकार्य लाभेल ते करण्यासाठी प्रयत्न करणार – लोकप्रिय दमदार आ. राम सातपुते
कु. मीनाक्षी जाधव यांनी सरकारी नोकरी मिळण्याबाबत आमदार राम सातपुते यांना दिले निवेदन
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते हे शासकीय विश्रामगृहात आले होते. यावेळी दिव्यांग कु. मीनाक्षी हरिश्चंद्र जाधव या आमदार राम सातपुते यांना निवेदन देण्यासाठी आले होत्या. परंतु अपंग असल्यामुळे आमदार राम सातपुते यांनी स्वतः बाहेर येऊन कु. मीनाक्षी जाधव यांची भेट घेतली आणि त्यांनी दिलेले निवेदन घेतले.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले होते की, कुमारी मीनाक्षी जाधव यांना बास्केटबॉल दिव्यांग टीम मधून दोन वेळा नॅशनल, महाराष्ट्र टीम मधून गोल्ड मेडल भेटले असून भारतासाठी दोन वेळा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळणे असून तसेच एक वेळ हँडबॉल वर्ल्ड चॅम्पियन खेळले आहे. तसेच अथलेटिक्स नॅशनलमध्ये सिल्वर आणि ब्रांझ पदक त्यांना मिळाले असून अथलेटिक्स स्टेट लेव्हलला तीन गोल्ड मेडल मिळाले आहेत. त्यांचा वयाच्या १९ व्या वर्षी बारावी मध्ये असताना झाडावरून पडून अपघात झाल्यामुळे मणका पूर्ण रिकामा झाला आहे. तेव्हापासून त्या व्हीलचेअर चा वापर करत आहेत. त्यातच २०१६ साली त्यांच्या वडीलांचा अपघात झाला. घरची परिस्थिती हालाखीची असून एक एकर क्षेत्र आहे. त्यांचा मोठा भाऊ कारखान्यात कामाला आहे पण, त्याचा वेळेवर पगार होत नाही. तसेच शेतात पुरेसे उत्पन्न नसल्याने घरी अडचण निर्माण होत आहे. त्यामध्येच आईची तब्येत सारखी बरी नसल्याने अडचण होते. तरी खेळाडू आरक्षण मधून सरकारी नोकरी मिळण्यासाठी नम्र विनंती या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
यावर आमदार राम सातपुते यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या भेटी घेऊन नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे कु. मीनाक्षी जाधव यांच्या चेहऱ्यावर आनंद तरळताना दिसत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very engaging and funny! For more information, visit: EXPLORE FURTHER. Let’s chat!