शिंदे सरकारचा नवा धक्का – विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांची नवी यादी पाठवणार.
पंकजाताई मुंडे, हर्षवर्धन पाटील, सदाभाऊ खोत, यांच्यासह अनेकांची संभाव्य नावे असण्याची शक्यता.
मुंबई ( बारामती झटका )
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांनी शुक्रवारी राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या 12 सदस्यांची नवी यादी पाठवण्याचे संकेत दिल्याची सूत्रांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दीड वर्षांपूर्वीच या जागांसाठी आपल्या 12 सदस्यांची नावे पाठवली होती. त्यामधील राजू शेट्टी यांनी नाव काढण्याची विनंती केलेली होती. त्यानंतर त्यांनी अनेकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे ही नावे हातावेगळी करण्याची विनंती केली. पण, राज्यपाल कोश्यारी यांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही.
आता नव्या सरकारच्या नव्या यादीवर ते कोणता निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पंकजाताई मुंडे, हर्षवर्धन पाटील, सदाभाऊ खोत यांच्यासह अनेकांची संभाव्य नावे असण्याची शक्यता आहे.
