शिवसेनेला विश्वासात घ्या अन्यथा…, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा खा. रणजीतसिंह निंबाळकरांना इशारा
करमाळा (बारामती झटका)
माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र, खासदार झाल्यानंतर माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला या भागातील शिवसैनिकांकडे खासदार निंबाळकर यांनी दुर्लक्ष केले असून लवकर चूक दुरुस्त करावी, अशी मागणी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे केली. यावेळी बार्शीचे आ. राजाभाऊ राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय सावंत, अनिल पाटील, मोहोळ तालुका प्रमुख अमोल बापू भोसले आदी उपस्थित होते.
निंबाळकर सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर आल्यानंतर केवळ ठराविक लोकांच्या संपर्कात असतात. मतदार संघात आल्यानंतर तेथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निरोप दिला जात नाही. खासदार निधी वाटतानासुद्धा कोणत्याही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही किंवा आमच्या विश्वासावर निधी दिला नाही, अशी स्पष्ट मागणी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली.
जिल्हा नियोजन मंडळाचा खासदार पोटाचा दहा टक्के निधी संपूर्णपणे भाजप कार्यकर्त्यांना वाटण्यात आला. यातसुद्धा शिवसेनिकांना विचारात घेतले नाही. माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार दौरे करत असताना शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांना निरोप दिले जात नाहीत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्येक शिवसैनिकाच्या घरी खासदारांचा निरोप जायचा. आता मात्र, खासदार शिवसैनिकांना टाळत आहेत काय, असा प्रश्नही काही शिवसैनिकांनी उपस्थित केला.
समन्वयाची बैठक घेणार – खा. रणजीतसिंह निंबाळकर
माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांची, शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच बैठक घेणार आहे.
शिवसैनिकांच्या भावना मला मान्य असून यापुढील काळात खासदार निधीतील 50 टक्के वाटा शिवसैनिकांना देऊ असे आश्वासन खासदार निंबाळकर यांनी यावेळी दिले. शिवाय जिल्हा नियोजन मंडळातील दहा टक्के खासदार निधी येणाऱ्या काळात पूर्णपणे शिवसैनिकांना देऊ असा शब्द दिला.
प्रा. शिवाजीराव सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख सोलापूर –
खासदार रणजितसिंह निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर आल्यानंतर शिवसैनिकांना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत, अशा अनेक तक्रारी पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे केले होते. त्यामुळे हा मेसेज थेट खासदार निंबाळकर यांच्या कानावर घातला असून त्यांनीही लवकरच समन्वय बैठक घेण्याची मान्य केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng