शिष्यवृत्ती परीक्षेचा इयत्ता ५ वी आणि ८ वीचा निकाल जाहीर – गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे
माढा (बारामती झटका) राजेंद्र गुंड-पाटील यांजकडून
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम ( तात्पुरता) निकाल सोमवार दि. ७ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं.६:०० वाजता www.mscepune.in व https://www.mscepuppss.In या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगिन मधून तसेच पालकांना आपल्या पाल्याचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळाच्या लॉगिन मध्ये दि. ७/११/२०२२ ते १७/११/२०२२ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता रुपये ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलाचे नाव, आईचे नाव, शहरी /ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादी मध्ये दुरुस्तीसाठी दि. १७/११/२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुण पडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये, अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसापर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुण पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल असे राज्य परीक्षा परिषदेकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.
माढा तालुक्यातील ज्या शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करावयाचे आहे, त्यांनी वेळेत अर्ज करावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे व शिष्यवृत्ती विभागप्रमुख महादेव सोनवणे यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
It’s very interesting! If you need help, look here: hitman agency