शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांनी उद्घाटन केलेला उद्योग यशस्वी चालवून तरुण युवक थेट राजू शेट्टी यांच्या घरी पोहोचला…
जयसिंगपूर ( बारामती झटका)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांनी 2011 साली दत्तक घेतलेला राजू जाधव आता चांगलाच स्थिरस्थावर झालेला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुणे पंढरपूर पालखी मार्गावर असलेल्या तोंडले-बोंडले येथील ” बळीराजा मिसळ”ला खवय्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. बळीराजा मिसळचे उद्धाटन करुन १० महिने झाले. अतिशय कष्टाने बळीराजा मिसळ चालवून राजू स्वत:च्या पायावर उभा राहिला. अल्पावधीतच राजूने स्वकष्टातून चारचाकी गाडी खरेदी केली. रात्रभर प्रवास करुन मोठ्या अभिमानाने गाडी दाखवायला आला. शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या शुभहस्ते गाडीचे पुजन करायला सकाळी ७ वा शिरोळ मध्ये येऊन पोहोचला.
महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक लोकांना चळवळीचे काम करून स्वतःच्या पायावर उभा राहण्याकरता सहकार्य व पाठबळ कायम दिलेले आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राजू जाधव सारखे अनेक कार्यकर्ते आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विचार घेऊन कार्य करून राजू शेट्टी साहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतात राजू जाधव याच्या गाडीचे पूजन करून शेट्टी साहेब यांनी भविष्यात वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng