चि. सुहास जाधव, मळोली आणि चि. सौ. कां. रागिनी सोळंके, रुई यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक
श्री. सचिन भीमराव जाधव
मु. पो. मळोली ता. माळशिरस.
मळोली (बारामती झटका)
श्री. हनुमंत निवृत्ती जाधव रा. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांची ज्येष्ठ चिरंजीव सुहास आणि श्री. बाळासाहेब श्रीराम सोळंके रा. रुई, ता. धारूर, जि. बीड यांची कनिष्ठ कन्या चि. सौ. कां. रागिनी सोळंके यांचा शाही विवाह सोहळा रविवार दि. 08/06/2025 रोजी दुपारी 12 वाजून 34 मिनिटे या शुभमुहूर्तावर आदित्य कृष्णा मंगल कार्यालय, बार्शी, उपळाई रोड, ता. बार्शी, येथे संपन्न होणार आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे प्रेषक श्री. सचिन भीमराव जाधव आणि समस्त जाधव परिवार मळोली यांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस निमंत्रण अथवा आमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे आपले नम्र सौ. सुमन व श्री. लक्ष्मण बाबू जाधव आणि समस्त जाधव परिवार मळोली यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.