उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांची याचिका कोल्हापूर हायकोर्टाने फेटाळली….

महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष यांच्यावरील पुनश्च नोटीसा देऊन अविश्वास ठरावावरील विशेष सभा घेण्याचे आदेश मे. न्यायाधीश यांनी दिले…
मोहिते पाटील गटाला हादरा उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांच्यावर अविश्वास ठराव पारित होणार…
महाळुंग (बारामती झटका)
महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भीमराव हनुमंत रेडे पाटील यांनी अविश्वास ठरावाबाबतची अनेक बाबींवर आक्षेप नोंदवत कोल्हापूर हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती. सदरच्या याचिकेवर कागदपत्रांचे पुरावे देऊन वास्तव चित्र न्यायालयासमोर आणलेले असल्याने कोल्हापूर हायकोर्ट मेहरबान न्यायाधीश यांनी याचिका फेटाळून पुनश्च नोटीस देऊन अविश्वास ठरावासाठी विशेष सभा घेण्याचे आदेश दिलेले आहेत. उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील मोहिते पाटील गटाचे असल्याने मोहिते पाटील गटाला राजकीय हादरा बसला आहे..

अविश्वास ठरावाबाबत घडलेली हकीकत अशी, महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 55 महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री. भिमराव हनुमंत रेडे पाटील यांना पदावरून दूर करण्यासाठी त्यांचे विरूध्द अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी नगराध्यक्ष यांना पत्र दिलेले आहे. सदरच्या पत्रात उपनगराध्यक्ष श्री. भीमराव हनुमंत रेडे पाटील यांचे वर सभागृहातील बहुसंख्य सदस्यांचा विश्वास उरलेला नसून नगरसेवकांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेणे, त्यामुळे नगरपंचायतीचे प्रशासन व कामकाज प्रभावीपणे चालविणे कठीण झालेले आहे.असा मजकूर देऊन त्यांना पदावरून दूर करण्याकरता त्यांचे विरोधात अविश्वासाचा ठराव विचारार्थ ठेवण्यात यावा असे पत्र दिलेले आहे.
महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष यांच्यावरील अविश्वास ठराव मांडण्यासाठी श्री. राहुल कुंडलिक रेडे, सौ. सविता शिवाजी रेडे, सौ. ज्योत्स्ना रावसाहेब सावंत पाटील, श्री. तानाजी नवनाथ भगत, श्री. सोमनाथ रघुनाथ मुंडफडे, श्री. नानासाहेब सुदाम मुंडफणे, श्री. प्रकाश वामन नवगिरे, सौ. तेजश्री विक्रमसिंह लाटे, सौ.शारदा नामदेव पाटील, श्री. निनाद प्रभाकर पटवर्धन, सौ. नाजीया मोहसीन पठाण, श्री. नामदेव हरिबा इंगळे अशा 12 नगरसेवकांच्या सहीचे विशेष सभेच्या मागणीचे पत्र नगराध्यक्ष यांच्याकडे दिलेले होते. 13 -8- 2026 रोजी मिळाले. त्यानंतर मी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना कळविले होते त्यानंतर दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी विशेष सभेच्या अजिंठा काढला सर्व नगरसेवकांना दिला व 19 ऑगस्ट 2026 रोजी विशेष सभा ठेवली होती .

माझी भूमिका जनतेने मला निवडून दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानून मी नियमाप्रमाणे काम करत आहे. जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत आहे. – सौ लक्ष्मी अशोक चव्हाण, नगराध्यक्ष, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



