ताज्या बातम्यासामाजिक

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वै. सुवर्णा अमोल रेडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ४०० पेरूच्या रोपांचे वाटप

महाळुंग (बारामती झटका)

वै. सुवर्णा अमोल रेडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रणाली डाळ मिल, लवंग यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत तब्बल ४०० पेरूच्या झाडांचे वाटप करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम ढवळे वस्ती, महाळुंग येथे आयोजित हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने पार पडला.

हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात ह. भ. प. ऋषिकेश थिटे महाराज, आळंदी यांची कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर उपस्थित भाविकांना पेरूच्या रोपांचे वाटप करण्यात आले. *प्रमोद भास्कर भोसले, सूरज भोसले आणि अक्षय भोसले राहुल शिंदे* व प्राजोत भोसले यांच्या हस्ते हा वृक्षवाटपाचा कार्यक्रम पार पडला.

भोसले परिवाराने सामाजिक कार्याची परंपरा जपत पुण्यस्मरणाच्या निमित्ताने केवळ श्रद्धांजली न वाहता पर्यावरण संवर्धनाचा आणि वृक्षलागवडीचा विधायक संदेश समाजासमोर ठेवला. प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, पर्यावरणाचे रक्षण करावे आणि पुढील पिढीसाठी हिरवाई जपावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या उपक्रमासाठी उपस्थित असलेल्या भाविकांनी आणि ग्रामस्थांनी ४०० पेरूच्या रोपांच्या वाटपाचे मनापासून कौतुक केले. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने करण्यात आलेला हा पर्यावरणपूरक उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.

प्रणाली डाळ मिल, लवंग यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

“पुण्यस्मरणातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प आणि वृक्षवाटपातून समाजसेवेचा संदेश” अशी या उपक्रमाची भावना असून, भोसले परिवाराने सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button