गोरडवाडी येथील सौ. लक्ष्मी व श्री. सोपान कर्णवर यांच्या 100 वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे नातवांकडून आयोजन….

नातवंडांनी केलेला आजी आजोबांसाठी एक अट्टाहास, नातवंडे म्हणजे दुधावरची साय…
गोरडवाडी (बारामती झटका)
गोरडवाडी, ता. माळशिरस गावातील सौ. लक्ष्मी व श्री. सोपान राजू कर्णवर यांचा 100 वर्षाचे प्रेम, त्याग आणि संस्कार यांचा अनमोल प्रवास. शतायुषी आजी-आजोबांचा 100 वा अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार दि. 27/08/2026 रोजी कर्णवर वस्ती, गोरडवाडी, माळशिरस-म्हसवड रोड, या ठिकाणी विविध उपक्रमाने अभिष्टचिंतन सोहळ्यांचे नातवांकडून आयोजन करण्यात आलेले आहे. नातवंडानी केलेला आजी आजोबांसाठी एक अट्टाहास आहे. नातवंडे म्हणजे आजी-आजोबांना दुधावरची साय, असे वाटत असतात आणि याच वाक्याला आजी आजोबांचे नातवंडे सार्थ ठरलेले आहे..
गोरडवाडी येथील कोंडाबाई व राजू कर्णवर यांना सोपान व महादेव दोन मुले तर पाच मुली असा परिवार होता. शेती व मेंढपाळ व्यवसाय करून हा परिवार आपला उदरनिर्वाह करीत होते. यशोदा व महादेव यांना जगाबाई हुलगे व पारूबाई खरात अशा दोन मुली आहेत. लक्ष्मी व सोपान यांना शिवाजी, हनुमंत, साहेबराव, बाजीराव, सर्जेराव अशी पाच मुले व अंजना नरूटे एक मुलगी असा मोठा परिवार होता. त्यापैकी राजू व कोंडाबाई यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी यशोदा व महादेव मयत झालेले आहे.

सोपान यांना नावातच लक्ष्मी असणाऱ्या लक्ष्मीबाई मोटेवाडी माळशिरस येथील रामा देवकते यांच्या कन्या सहचारिणी म्हणून लाभल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सोपान आणि लक्ष्मी यांचा विवाह झालेला आहे. पाच मुले आणि एक मुलगी यांचा अतिशय संसार चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यापैकी साहेबराव कर्णवर यांनी कारखान्यामध्ये नोकरी केलेली आहे. गावचे उपसरपंच पद भूषवलेले आहे. बाकीचे सर्व शेती व उद्योग व्यवसाय करणारा परिवार आहे.
पूर्वीच्या काळी बैलगाडीने ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्यावेळेला सोपान यांनी बैलगाडीने ऊस वाहतूक केलेली आहे. त्यामुळे पहिल्यापासून बैलावर प्रेम केलेले आहे. ग्रामीण भागात गजी ढोल खेळाचा प्रकार गावोगावी खेळला जात असतो. सोपान हे गावचे ग्रामदैवत बिरोबा देवाचे निस्सीम भक्त आहेत. ते गजी उत्कृष्ट खेळत होते, असे असणारे सर्व गुण संपन्न सोपान व लक्ष्मी यांचा शतक महोत्सवी सोहळा कार्यक्रमाचे नातवंडांनी आयोजन केलेले आहे.

सध्या कर्णवर परिवारातील तिसरी पिढी मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यवसायात आहेत. त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय, शेती, राजकारण, समाजकारण सुरू आहे. सोपान व लक्ष्मी यांनी परिवारांना दिलेले संस्कार, प्रेम, त्याग त्यांचा अनमोल प्रवासाचा नातवंडांनी उतराई होण्याचा प्रयत्न केलेला आहे. 100 वा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हरिनामाचा गजर भक्ती भाव सागर यासाठी कीर्तन, गोड स्वरात भक्ती गीतांचा संगम गायनाचा कार्यक्रम, परंपरेचा गजर जपण्यासाठी गजी ढोल आणि त्यानंतर स्वादिष्ट रुचकर चविष्ट भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी 100 वा अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन समस्त कर्णवर पाटील, गोरडवाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



