हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, रनर, राष्ट्रीय खेळाडू असून सुद्धा स्वाभिमानाने जीवन जगण्याकरता बांगडी व्यवसाय करणारा अवलिया….

यशाच्या शिखरावर उंच जाऊन चंद्राला हात टेकण्याएवढी उंची होऊन सुद्धा जमिनीशी घट्ट नातं जपणारा अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट कुटुंबकर्ता, कवी मनाचा, सर्वांच्या प्रेमाचा माणूस…
अकलूज (बारामती झटका)
समाजामध्ये अशी कितीतरी माणसे असतात, आपण कोण आहोत हे विसरून आपल्या पूर्वजांनी सुरू केलेला व्यवसाय सुरू ठेवून आपलं आयुष्य स्वाभिमानाने आणि अभिमानाने जगत असतात. त्यापैकीच एक चंद्राला हात टेकण्याएवढी उंची झाली तरीसुद्धा जमिनीशी नातं घट्टपणे जपणारे हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, रनर या खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळलेले श्री. जहांगीर अजमुद्दिन सय्यद रा. अकलूज हे आहेत. श्री. जहांगीर अजमुद्दिन सय्यद यांचा आदर्श घ्यावा, अशा पद्धतीने बांगडी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारा हा अवलिया समाजाला प्रेरणा देणारी अशी ही त्यांची कहाणी घटना आहे…
श्री. जहांगीर अजमुद्दीन सय्यद यांचा वाडवडिलार्जित बांगडी व्यवसाय करणे सुरू आहे. त्यांनी बांगडी व्यवसायाबरोबर मर्दानी खेळ जोपासलेले आहेत. हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, रनर या खेळामध्ये नॅशनलपर्यंत खेळलेले उत्कृष्ट खेळाडू आहेत. खेळाचा अभिमान नाही. परिस्थितीची जाण असून उदरनिर्वाहाकरता बांगडी व्यवसाय सुरू आहे. श्रीपुर येथे डोक्यावर बांगड्याची पाटी घेऊन जहांगीर सय्यद आपला व्यवसाय करीत आहेत. खिलाडू वृत्ती व व्यवसाय या दोन्हीची सांगड घालून त्यांच्यामध्ये असणारे कवी मन सुद्धा वेळ मिळाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने कविता करीत असतात. श्रीपुर येथे भेट झाल्यानंतर बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी श्री जहांगीर सय्यद यांनी दिलेली कविता वाचकांसाठी आम्ही जशीच्या तशी वाचण्याकरता देत आहोत. अशा सर्व गुण संपन्न श्री. जहांगीर सय्यद यांच्या कार्याला सलाम…

कवितेचे नाव प्रेतयात्रा
प्रेतयात्रा निघाली स्मशानभूमीकडे,
प्रेतयात्रा चार जणांच्या खांद्यावरती,
काही लोक रडत होते, काही हसत होते,
प्रेतयात्रा निघाली स्मशानभूमीकडे….
काही लोक पैसे उधळत होती,
काही लोक पैसे गोळा करत होती,
प्रेतयात्रा निघाली स्मशानभूमीकडे….
तुझा श्वासोच्छवास चालत राहतो,
तोपर्यंत तुझ्यावर सर्वजण प्रेम करतात,
मात्र श्वास समाप्त होताच तेच लोक,
एक क्षणाचाही विलंब न करता,
तो देह जाळून टाकतात,
प्रेतयात्रा निघाली स्मशानभूमीकडे….
या निसर्गाचा नियम आहे की,
जो कोणी ह्या पृथ्वीतलावर येतो चार दिवस,
पाहुणे प्रमाणे राहून सर्व काही सोडून
येथून निघून जातो,
प्रेतयात्रा निघाली स्मशानभूमीकडे….
त्यामुळे मरणापूर्वी किंवा झोपण्यापूर्वी,
जेवढे चांगले करता येईल तेवढे करा,
प्रेतयात्रा निघाली स्मशानभूमीकडे….
असा जन्म लाभावा देहाचे चंदन व्हावे,
आयुष्य संपले तरी सुगंध दरवळीत राहावे,
प्रेतयात्रा निघाली स्मशानभूमीकडे….
श्री. जहांगीर आजमुद्दीन सय्यद
हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, रनर खेळाडू
अकलूज ता.माळशिरस
9260007243

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



