प्रचितीगड मुंबई येथे सोलापूर जिल्हा व माळशिरस तालुक्यातील राजकीय रणनीती ठरली…

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले…
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मुंबई येथील प्रचितीगड शासकीय निवासस्थानी सोलापूर जिल्हा व माळशिरस तालुक्यातील राजकीय रणनीती ठरली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, करमाळा विधानसभेचे आमदार नारायण आबा पाटील, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली…
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या राजकारणाला माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात राजकीय धुरा मुधोजीराव तथा नानासाहेब देशमुख यांनी सांभाळलेली आहे. श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर या कारखान्यावर चेअरमन पद भूषवून कारखाना सुस्थितीत चालवलेला होता. त्यांच्या पश्चात बाबाराजे देशमुख यांनी व्हाईस चेअरमन पदाची धुरा सांभाळली होती. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पदावर कार्यरत आहेत. बाबाराजे देशमुख यांचा माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मोहिते-पाटील यांच्या राजकारणामध्ये मराठा राजकारणी होते.

बाबाराजे देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून जलसंपदा मंत्री तथा संकट मोचन ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात ताकद वाढलेली असून मोहिते पाटील यांचा राजकीय बुरुज ढासळलेला आहे. बाबाराजे देशमुख यांच्यावर भविष्यात निश्चितपणे मोठी जबाबदारी देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. बाबाराजे देशमुख यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीमुळे मोहिते पाटील यांचे टेन्शन वाढलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



