श्री. गणेशभाऊ बत्तासे यांना राज्यस्तरीय ‘कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव’ पुरस्कार प्रदान
कोपरगाव (बारामती झटका)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव (कोळपेवाडी) येथील सर्व सामान्य घराण्यामध्ये राहत असलेला सामाजिक कार्यकर्ता श्री. गणेशभाऊ बत्तासे यांनी कोरोनाच़्या महामारीमध्ये रुग्णांजवळ जाण्यास नातेवाईक सुध्दा जात नसत, अशावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेशभाऊ निवृत्ती बत्तासे हे धाडसाने रुग्णांजवळ जात होते.


तसेच त्यांना ना. श्री. आशुतोष दादा काळे साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व नागरीकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. आणि रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात मदत केली. म्हणून गणेशभाऊ बत्तासे यांच्या कामाची दखल घेण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या महामारीमुळे २०२० मध्ये जाहीर झालेला पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट मुंबई यांच्यावतीने राज्यस्तरीय ‘कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव’ म्हणून दि. १० जुलै २०२२ रोजी पुरस्कार देण्यात आला.

तसेच त्यांचे सुरेगाव ग्रामपंचायत सर्व गावकरी व कोळपेवाडी ग्रामस्थ व माजी आमदार श्री. अशोकदादा काळे साहेब, सौ. पुष्पाताई काळे व शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष व ना. श्री. आशुतोष दादा काळे साहेब, सौ. चैताली ताईसाहेब काळे यांनी त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून आंध्रप्रदेश येथील इंटरनेशनल टॅलेंट आयकॉन मा. डॉ. जे. सानिपीना राव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. डॉ. मिनाक्षी गवळी, मा. डॉ. सौ. पूनम बिरारी, योग पंडित मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल आदि मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

