श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ४९ वा गळीत हंगामाचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
सदाशिवनगर (बारामती झटका)
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या कारखान्याच्या सिजन 2022 – 23 चा 49 वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तसेच कारखाना स्थळावर्ती सत्यनारायण पूजा संचालक रमेश जगताप व त्यांच्या सुविद्य पत्नी संगीता जगताप यांच्याहस्ते करण्यात आले.
भरत सोपान पाटील यांच्या ऊस गाडीचे व काट्याचे पूजन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील व व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी व संचालक मंडळाच्या अध्यक्षतेखाली 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेनिमित्त शंकरराव मोहिते पाटील, अक्कासाहेब उर्फ रत्नप्रभादेवी मोहिते पाटील व पप्पासाहेब उर्फ प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे जेष्ठ सभासद जगन्नाथ कोरटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, शिवामृत दुध संघांचे चेअरमन धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख आदी उपस्थित होते.
तर प्रमुख उपस्थितीत सहकार महर्षी कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रकाश पाटील, विनायक जाधव महाराज, जेष्ठ नेते भारत नाना पाटील, परमेश्वर देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, जेष्ठ नेते गणपतराव वाघमोडे, शिवामृत दुध संघांचे माजी व्हा. चेअरमन सावता ढोपे, माळशिरस नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष शिवाजी देशमुख, नातेपुते नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे (आबासाहेब) देशमुख, महाळुंग नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील, शंकरराव मोहिते पाटील सूतगिरणीचे चेअरमन तुकाराम अप्पा काळे, सर्व संचालक मंडळ, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, बाळासाहेब वावरे, हनुमंत सूळ, कांचनमाला मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, बाळासाहेब होले, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रतापराव पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, सुभाषदादा निंबाळकर, सुभाष कुचेकर, मदन बापू पाटील, अमरभाऊ माने देशमुख, नितीनराजे निंबाळकर, रवी पाटील, जेष्ठ नेते प्रफुल्ल काका कुलकर्णी, RPI जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले, तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, दादा पाटील, खुडूस, नरेंद्र भोसले, दत्ता सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, राहुल बापू वाघमोडे, मोहन लोंढे, विलास आदरट, रत्नत्रय उद्योग समूहाचे संस्थापक अनंतलाल दोशी, पंचायत समिती माजी सदस्य मानसिंग मोहिते, बाळासाहेब लवटे, ओंकार माने देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केशव कदम, कांता आबा मगर, विष्णू केमकर, रामभाऊ माने, शिवामृत दुध संघांचे संचालक लक्ष्मण पवार, नारायण सालगुडे, सचिन रणनवरे, विजय नरुटे, अरविंद भोसले, शरद साळुंखे, सुरेश पिसे, लिंगा पाटील, तानाजी पालवे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, शिवामृत दुध संघाचे संचालक, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी, सभासद व कामगार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक दत्तात्रय रननवरे यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This was both informative and hilarious! For further reading, check out: LEARN MORE. What do others think?