Uncategorized

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर व मोळी पूजन कार्यक्रमास सदाशिवनगर प्रथम नागरिक उपस्थित राहणार का ?

थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सौ. आशाताई नागनाथ ओवाळ यांची पाच वर्षांत सदाशिवनगर ग्रामपंचायतीमध्ये दमदार कामगिरी

सदाशिवनगर (बारामती झटका )

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील उद्योग व्यवसाय व राजकीय दृष्ट्या सर्वात महत्त्वाची समजली जाणारी सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणुकीत थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सौ. आशाताई नागनाथ ओवाळ यांनी पाच वर्षात सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्य व अडचणीतील जनतेसाठी दमदार कामगिरी केलेली आहे. सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर प्रतिपादन व मोळीपूजन कार्यक्रमास राजकीय सूडबुद्धीने प्रथम नागरिक असताना सुद्धा जाणीवपूर्वक डावलले जात होते. सध्या सदाशिवनगर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरू झालेला आहे. येणाऱ्या साखर कारखान्याच्या बॉयलर व मोळी पूजन कार्यक्रमास प्रथम नागरिक उपस्थित राहणार का ?, असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जात आहे.

सौ. आशाताई नागनाथ ओवाळ थेट जनतेतील सरपंच पदासाठी निवडणुकीत उभ्या होत्या. त्यांना समस्त सदाशिवनगर गावातील मतदारांनी मतदान करून निवडून दिलेले होते‌. सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी गटातटाचे राजकारण न करता सर्वसामान्य जनतेची कामे केलेली आहेत. सदाशिवनगर ग्रामपंचायतीचा अनेक दिवसाचा विस्तारित नळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न त्यांच्या कालावधीत सुटलेला आहे. 90 लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना राबवलेली आहे. त्यामध्ये त्यांना मतदान देणारे अथवा न देणारे यांनाही पिण्याच्या पाण्याचा उपयोग होणार आहे.

विकासकामे करीत असताना मनामध्ये दुजाभाव कधीही ठेवलेला नाही. सौ. आशाताई यांना त्यांचे पती नागनाथ ओवाळ यांचीही मोलाची साथ मिळालेली आहे‌. पत्नीच्या ग्रामपंचायतीच्या राजकीय कारभारात कधीही हस्तक्षेप केला नाही. सरळ मार्गे ग्रामपंचायतीचा पाच वर्ष कारभार निस्वार्थ व निःपक्षपातीपणे चालवलेला आहे.

मात्र त्यांना श्री शंकर सहकारी साखर कारखाना चेअरमन व व्हाईस चेअरमन संचालक कारखाना प्रशासन यांच्याकडून दुजाभावाची वागणूक दिलेली आहे. गेल्या दोन वर्षापासून बंद असलेला श्री शंकर साखर कारखाना सुरू झालेला आहे. कारखान्याच्या बॉयलर प्रतिपादन व मोळी पूजन कार्यक्रम मोठ्या थाटामाटात व तालुक्यातील अनेक राजकीय नेते व लोकप्रतिनिधी यांना बोलावून कार्यक्रम केला जात आहे. गावच्या प्रथम नागरिक सौ. आशाताई ओवाळ यांना कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये स्थान देणे क्रमपात्र असताना नातेपुते, माळशिरस, महाळुंग, श्रीपुर येथील प्रथम नागरिक यांची नावे पत्रिकेत टाकून स्थानिक प्रथम नागरिक यांना जाणीवपूर्वक राजकीय सूडबुद्धीने डावलले जात होते.

कारखान्याने जरी कार्यक्रमाला डावलले असले तरीसुद्धा सदाशिवनगर जनतेने सौ. आशाताई ओवाळ यांना सरपंच पदासाठी स्वीकारले होते. सध्या सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या निवडणूकिची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावातील दोन गट एकत्र करून सरपंच मोहिते पाटील गटाचा करण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे. लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच मोहिते पाटील यांच्या विचाराचा व्हावा यासाठी आटापिटा सुरू आहे. सर्वसामान्य जनता लक्ष ठेवून आहे. मोहिते पाटील यांच्यापेक्षा गावाचा विकास करणारा लोकनियुक्त सरपंच असावा, अशी भावना सर्वसामान्य जनतेची आहे. त्यामुळे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर व मोळी पूजन कार्यक्रमास पुढील वर्षी सदाशिवनगर ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक उपस्थित राहणार का ? अशी शंका राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केली जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button