Uncategorized

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी महामार्गावरील शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीचे काम प्रगतीपथावर.

शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अद्यावत मशनरी, नवीन प्लांट व योग्य नियोजन यामुळे गतवैभवाकडे वाटचाल

अकलूज ( बारामती झटका )

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी महामार्गावरील देहू-पुणे-इंदापूर-अकलूज-पंढरपूर या महामार्गातील अकलूज ते तोंडले बोंडले या पालखी महामार्गाचे काम शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतलेले असून सध्या महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीने अद्यावत लागणाऱ्या नवीन मशनरी व क्रश सेंड डांबर प्लांट अद्यावत केलेले असल्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कन्स्ट्रक्शनमध्ये नाव होते. उद्योग महर्षी स्वर्गीय उदयसिंह मोहिते पाटील यांच्या आजारपणात व त्यांच्या पश्चात शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीचे रेंगाळलेले काम, पुन्हा जोमाने व योग्य नियोजनामुळे प्रगतीपथावर असल्याने गतवैभवाकडे वाटचाल सुरू झालेली आहे.

राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग महर्षी उदयसिंह मोहिते पाटील यांनी शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीची सुरुवात केलेली होती. कन्स्ट्रक्शन व उद्योग व्यवसायामध्ये उदय बापूंनी आपला वेगळा ठसा उमटविलेला होता. उदयबापूंचे आजारपण व दुःखद निधन झाल्यानंतर शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीची अधोगती झालेली होती. शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी व उद्योग व्यवसायामध्ये पुन्हा भरारी स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने व विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील व अकलूजचे माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा गत वैभव निर्माण केलेले आहे. पुणे, मुंबई व राज्यात इतर ठिकाणी स्वर्गीय उदयबापू यांनी उद्योग व्यवसाय सुरू केलेले होते. सध्या सदरचे उद्योग व्यवसाय कीर्तीदादा सांभाळत आहेत, तर शिवरत्न कन्स्ट्रक्शन शिवबाबा पाहत आहेत. शिवशंकर बाजार सत्ता स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील पाहत आहेत.

शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीने उद्योग महर्षी स्वर्गीय उदयबापू यांच्या पश्चात श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे जवळजवळ 22 किलोमीटर रस्त्याचे काम सहाशे कोटीच्या आसपास घेतलेले आहे. रणजीतदादा व कीर्तीदादा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवबाबा यांचे पालखी महामार्गाचे उत्कृष्ट काम सुरू असून काम प्रगतीपथावर आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button