संपूर्ण महाराष्ट्रातील जनता सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी प्रयत्न करणार – आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत
करमाळा (बारामती झटका)
सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनता, कष्टकरी, शेतकरी, मजूर खिशात पैसा नसल्यामुळे शारीरिक तपासण्या करून होणाऱ्या आजारावर उपचार करत नाहीत. अनेक दिवस अंगावरच आजार काढतात. यामुळे अशा रुग्णांचे आयुष्यमान कमी होते. यामुळे आता ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन उपचार देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र सुदृढ आणि निरोगी करण्यासाठी माझा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी केले. महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन होऊन पहिल्या दिवशी सुमारे दीड लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली.
आरोग्य शिबिराच्या निमित्ताने परांडा शहराला आषाढी एकादशीला पंढरपूरला ज्या पद्धतीने वारकरी जमतात, त्या पद्धतीने आज परांडात गर्दी झाली होती. भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 5000 तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व रुग्णांची जेवणाची, नाश्ता, चहापाणी सोय करण्यात आली होती. सदर महा शिबिराला पहिल्याच दिवशी या प्रचंड प्रतिसाद मिळाला. रुग्णांची ये-जा करण्यासाठी जवळपास सहा हजार वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी बोलताना आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत म्हणाले की, ‘माता सुरक्षित तर, घर सुरक्षित’ या अभियानांतर्गत चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी झाली आहे. या माध्यमातून निष्पन्न झालेल्या आजारांचा सर्व डाटा करण्याचे काम महाराष्ट्र शासनापासून सुरू आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाची संपूर्ण देशातच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सुद्धा चर्चा झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक महिला निरोगी पाहिजे, यासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध आहे.
त्याचबरोबर ग्रामीण भागातील जी जनता पैसा नाही म्हणून उपचार करून घेत नाही, अशा रुग्णांना सर्व प्रकारची आरोग्य सेवा मोफत देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गोरगरिबांवर मोफत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्र निरोगी व सुदृढ करण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे सांगितले.
या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून धाराशिव सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख रुग्णांची तपासणी करण्याची नियोजन आहे. या दोन्ही जिल्ह्यातील बाळासाहेबांचे शिवसेनेचे कार्यकर्ते अहोरात्र यासाठी परिश्रम घेत असून शिबिराची दखल देश पातळीवर होईल, असे आम्ही काम करणार आहोत असे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी यावेळी सांगितले.
महाआरोग्य शिबिराची वैशिष्ट्ये
संपूर्ण देशात सर्वात जास्त रुग्ण सहभागी होणारे पहिले महाआरोग्य शिबिर
देश-विदेशातील 5000 तज्ञ डॉक्टरांचा शिबिरात सहभाग
जवळपास दोन कोटी रुपयांच्या औषधाचे मोफत वितरण
सोनोग्राफी व एक्स-रे काढल्यानंतर निष्पन्न झालेल्या आजारावर रुग्णांवर उपचार करण्याचे तातडीने शासकीय रुग्णालयांना आदेश
आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत आरोग्य शिबिरात स्वतः जातीने हजर राहून प्रत्येक विभागाचा आढावा घेत होते
देशातील पहिलेच महाआरोग्य शिबिर आहे असे की त्यात रुग्णांना येण्या-जाण्यापासून नाष्टा, चहापाणी, जेवण याची सर्व सोय मोफत करून देण्यात आली होती
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सोलापूर धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 4000 बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत होते.
सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील सर्व बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचा सत्कार करण्याचे नियोजन केले होते. मात्र हा सत्कार स्वीकारण्यास त्यांनी नम्रपणे नकार देऊन माझा सत्कार करण्यापेक्षा उपस्थित असलेल्या रुग्णांची सेवा करा, त्यांना प्रत्येक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम करा हाच माझा सत्कार असणार आहे असे सांगत सत्कार स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng