Uncategorizedआरोग्यताज्या बातम्या

सदाशिवनगर येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

विधान परिषदेचे आ.रणजितसिंह मोहिते पाटील आणि माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि. १०/६/२०२३ रोजी सकाळी ९ वा. शिवामृत भवन, सदाशिवनगर येथे करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तर, शिवामृत दूध उत्पादन संघ मर्यादित विजयनगर, अकलूजचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या शिबिराचे आयोजन शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माळशिरस, श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर, सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी वर्ग, येळीव, जाधववाडी, पुरंदावडे, सदाशिवनगर ग्रामपंचायत, मांडवे ग्रामस्थ, तामशीदवाडी ग्रामपंचायत, सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ आणि जिव्हाळा फाउंडेशन, सदाशिवनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी, या भव्य रक्तदान शिबिरास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button