सन्मान शेसाई फाउंडेशनच्या वतीने माळशिरस क्रिकेट प्रीमियम लीग 2023 भव्य नियोजन..
ॲड. आप्पासाहेब वाघमोडे क्रिकेट क्लब माळशिरस यांच्यावतीने भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील सन्मान शेसाई फाउंडेशन यांच्या
वतीने माळशिरस क्रिकेट प्रीमियर लीग 2023 दि. 17 मे ते 21 मे 2023 भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ॲड. आप्पासाहेब वाघमोडे क्रिकेट क्लब माळशिरस यांच्यावतीने भव्य आणि दिव्य नियोजन पुणे-पंढरपूर रोडवर सर्टिफाईड ग्राउंड येथे करण्यात आलेले आहे.
भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक 1,00,001 रोख रक्कम व चषक द्वितीय क्रमांक 75,001 व चषक, तृतीय क्रमांक 40,001/- व चषक, चौथे क्रमांक 30,001/- व चषक असे असणार आहे. प्रत्येक दिवशी मॅन ऑफ द सिरीज काढण्यात येईल त्यासाठी प्रत्येक विजेत्याला 32″ इंची एलईडी टीव्ही देण्यात येणार आहे. व्यक्तिगत बक्षीस देखील असणार आहेत. त्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, अशा अनेक व्यक्तिगत बक्षिसांसाठी 11 सायकली आहेत. सदरच्या प्रवेश फी गाववाईज 7500, तालुका वाईज 8500 फी राहणार आहे. तालुका वाईज 16 टीम व गाव वाईज 16 टीम यांची मर्यादा राहणार आहे. स्पर्धेसाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन यापैकी दोन ओळखपत्र बंधनकारक राहतील. गाव वाईज सोळा संघ राहतील. तालुका वाईज सोळा संघ राहतील.
सर्वसामने बाद पद्धतीने खेळवले जातील. फेकी गोलंदाज चालविला जाणार नाही. दोन रन पेनल्टी गोलंदाज बॅन केला जाईल. प्रत्येक संघाने एक तास अगोदर हजर राहावे. प्रत्येक संघास दोन रिव्ह्यू भेटतील. वाईडला चालणार नाही. प्रत्येक खेळाडूस शूज व ब्लॅक पॅन्ट कंपल्सरी राहील. दोन रन पेनल्टी संग नोंदणी करताना पन्नास टक्के रक्कम भरावी. पंचाचा निर्णय अंतिम राहील. प्रत्येक सामने सहा शतकाचे खेळवले जातील. सामन्यांमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार सामना समितीकडे राहील. गैरवर्तन करणाऱ्या संघास तीन रन पेनल्टी राहील. संघ नोंदणी अंतिम दि. 12/05/2023 राहील गाव वाईज मधील हरलेला किंवा जिंकलेला खेळाडू तालुका वाईजमध्ये खेळविला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व संघनायक व खेळाडू यांनी ज्ञानेश्वर शिंदे 9284888082, दीपक मंजुळे 7276567789, हर्षद धाईंजे 9970693619, अनिल शिंदे 9130113501, रवी लष्करे 8408814453 यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजक वस्ताद ॲड. आप्पासाहेब वाघमोडे यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng