समाजसेविका सौ. संस्कृतीताई सातपुते यांची पांढरे इलेक्ट्रिकल्स दुकानाचे नूतनीकरणाच्या भव्य उद्घाटनास सदिच्छा भेट…
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते ता. माळशिरस येथील पांढरे इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे नूतनीकरणाच्या भव्य उद्घाटन समारंभास भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी समाजसेविका सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पांढरे परिवार यांच्यावतीने सन्मान करण्यात आलेला आहे.
श्री. दादासाहेब काशिनाथ पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र व श्री. विजय यांनी 2002 साली पांढरे इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या व्यवसायास सुरुवात केलेली होती. दिवसेंदिवस उद्योग व्यवसायामध्ये पांढरे परिवार यांनी आपले नाव प्रत्येकाच्या मनामनात व घराघरात कोरलेले आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये अशी कितीतरी कुटुंबे, घरे असतील की त्यांच्या घरामध्ये पांढरे इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स मधील वस्तू नाही असे सापडणे मुश्कील आहे. प्रत्येक नमुन्याच्या वस्तू खात्रीशीर व किफायतशीर किंमतीमध्ये उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये नातेपुते गाव आहे आणि या गावांमध्ये प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय करून पांढरे परिवार यांनी नातेपुते नगरीच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा हरवलेला आहे.

दोन दशकानंतर पांढरे परिवार यांनी दुकानाचे नूतनीकरण करून भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शनिवार दि. 22/04/2023 रोजी सकाळी 10 वाजून 45 मिनिटे या शुभमुहूर्तावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत केले होते. यावेळी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचीही उपस्थिती राहणार होती मात्र, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने भारतीय जनता पक्षाने विशिष्ट जबाबदारी दिलेली असल्याने आमदार राम सातपुते यांना उपस्थित राहता आले नाही. त्यांची उणीव समाजसेविका सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांनी भरून काढून शुभमुहूर्तावर पांढरे परिवारांना शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहून यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीरपणे स्त्री असल्याचे मूर्तीमंत उदाहरण आपणांस पहावयास मिळत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
