Uncategorizedताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावरील लक्झरी बसच्या भीषण अपघातात २४ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बुलढाणा (बारामती झटका)

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली असून अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सिंदखेड राजा परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवासी प्रवास करत होते. बुलढाणाजवळच सिंदखेडराजा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली आणि रस्त्यावरच उलटली. हा अपघात इतका भीषण होता की क्षणार्धात बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला‌. या भीषण अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर, काही प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे‌. दररोज किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत. परिवहन विभागाकडून अपघात रोखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत मात्र, अद्यापही अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button