सर्वोच्च न्यायालयाने डोळस यांची उत्तमराव जानकर यांच्या विरोधातील स्पेशल लिव पिटीशन फेटाळली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून उत्तमराव जानकर समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
दिल्ली (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांचे सुपुत्र संकल्प डोळस यांनी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर दाखल्याच्या विरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयात एसएलपी स्पेशल लिव पिटीशन दाखल केलेले होते. दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी सुनावणी ठेवलेली होती. देशातील जेष्ठविधीतज्ञ ॲड. शाम दिवाण व सुनील कदम यांनी उत्तमराव जानकर यांच्या बाजूने वस्तुनिष्ठ युक्तिवाद मुद्देसुद मांडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपण मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दाखल केलेली पिटीशन परत घ्यावी अन्यथा फेटाळण्यात येईल, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे सांगितल्याने एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत उत्तमराव जानकर समर्थक यांनी करून आनंद उत्सव साजरा केलेला आहे.
याचिका कर्ता संकल्प डोळस यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल्यासाठी दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजलेली होती. उत्तमराव जानकर यांचे पारंपारिक विरोधक असणारे मोहिते पाटील यांच्या संपर्कात संकल्प डोळस आल्याचे सोशल मीडियावर जनतेने पाहिले आहे. मोहिते पाटील यांच्यासोबत नागपूर अधिवेशनातील वारी वाया गेली असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा पिटीशन दाखल करणार का ? आणि दाखल केल्यानंतर दाखला रद्द करण्याचा संकल्प डोळस यांच्याआडून मोहिते पाटील यांचा हेतू सफल होईल ? का मृगजळ होईल ?, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील निर्णय रद्द करण्याचा अधिकार सुप्रीम न्यायालयाला आहे. सर्वोच्च न्यायालय यांनी मुंबई न्यायालयाचा निर्णय जसाच्या तसा ठेवलेला असल्याने संकल्प डोळस दाद कोठे मागणार, असा कायदेतज्ञ व सर्व सामान्य जनतेमधून सवाल उपस्थित होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng