Uncategorizedताज्या बातम्या

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकार परिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान

वाघोली (बारामती झटका)

दि. २५ सप्टेंबर रोजी मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सह. महर्षी शंकरराव मोहिते पाटील सह परिषद महाराज्य यांचेवतीने माळशिरस तालुक्यातील विविध विभागात कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी यांचा मानचिन्ह व मानपत्र देऊन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील, पंचायत समिती माळशिरसचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सह. महर्षी शंकरराव माहिते पाटील सह परिषदचे राज्य अध्यक्ष प्रकाश कराळे, पंचायत समिती माळशिरसचे माजी सभापती रावसाहेब पराडे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, सहाय्यक गटविकास अधिकारी मोरे, मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, पुणे विभागीय कार्याध्यक्ष रवींद्र पवार तसेच मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. रामचंद्र मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती माळशिरस येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज सभागृहात पंचायत समिती माळशिरस येथील कार्यरत असणारे विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना राज्य पातळीवरील, विभागीय पातळीवरील व जिल्हा पातळीवरील गुणवंत कर्मचारी म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार प्राप्त कर्मचारी व अधिकारी यामध्ये जिल्हा परिषद बांधकामचे उपअभियंता अशोकराव रणनवरे, पंचायत समिती माळशिरसचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, इंडियन आर्मी कॅप्टन विवेक मोरे, लेफ्टनंट इंडियन आर्मीचे साहिल जाधव, कोथळेच्या सरपंच दिपाली गुरव, पुरंदावडेचे सरपंच देविदास ढोपे, अहिल्यादेवी विकास सोसायटी मोटेवाडीचे चेअरमन संदीप पाटील, कुमार क्षितिज काळे वैद्यकीय विभाग यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तसेच विभागीय स्तरीय पुरस्कारात विठ्ठल कोळेकर विस्ताराधिकारी पंचायत समिती माळशिरस, डॉ‌. संकल्प जाधव वैद्यकीय अधिकारी माळीनगर, डॉ. जरीना शेख वैद्यकीय अधिकारी फोंडशिरस, विस्तार अधिकारी श्रीमती प्रतिभा पवार, ग्रामविकास अधिकारी बाळू अण्णा भोसले, ग्रामसेवक सोमनाथ होळ, ग्रामसेविका सारिका भापकर, ग्रामसेवक विजयकुमार नवले, ग्रामसेवक संतोष पानसरे व सहाय्यक पशुधन अधिकारी डॉ‌. संदीप पवार यांना विभागीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

तसेच जिल्हास्तरीय पुरस्कारामध्ये विठ्ठल कोडग वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक, विलास मोरे ग्रामसेवक, शबाना तांबोळी आरोग्यसेविका, श्रीमती अनिता शिंदे ग्रामसेविका, पांडुरंग दुधाळ ग्रामसेवक, सुनील लोंढे आरोग्य सेवक, बाळू शिंदे कनिष्ठ लेखाधिकारी, मंगल काळे आरोग्य सेविका, संजय गिराम वरीष्ठ सहाय्यक व आसमा मुजावर आरोग्य सेविका यांना जिल्हास्तरावरील पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सदर पुरस्कार वितरणावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी परिषदेचे राज्याध्यक्ष प्रकाश कराळे तसेच मराठा सेवा संघ माळशिरस तालुक्याचे सर्व पदाधिकारी व पंचायत समिती माळशिरसचे कर्मचारी, ग्रामसेवक बंधू, विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रदेशाध्यक्ष प्रकाश कराळे यांनी सह. महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे सहकारातील कार्य मराठा सेवा संघ व सह कक्ष राज्य व राज्याबाहेरही प्रसार करीत असून त्यांच्या कार्याचे व मोहिते पाटील परिवाराने केलेल्या कार्याचे कौतुक केले.

सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील सहकार परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय विभाग स्तरीय जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण केल्याबद्दल कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे विजयसिंह शंकररावजी मोहिते पाटील, मदनसिंह शंकररावजी मोहिते पाटील, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील तसेच पंचायत समिती माळशिरसचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नेटके आयोजन केल्याबद्दल पुणे विभागीय कार्याध्यक्ष रवींद्र पवार व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा संघाचे सचिव राजेंद्र मिसाळ यांनी करून आभार डॉ. संकल्प जाधव यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button