सह्याद्री ॲग्रोचे चेअरमन विलास कदम यांच्याकडून माढा येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना २७५ वह्या व पेनचे मोफत वाटप
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्तुत्य व विधायक उपक्रम
माढा (बारामती झटका)
माढा तालुक्यातील मानेगाव येथील सह्याद्री ॲग्रो दूध संकलन व शीतकरण केंद्राचे संस्थापक चेअरमन विलास भागवत कदम यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कापसेवाडी-हटकरवाडी येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना २७५ वह्या व पेनचे मोफत वाटप करुन विधायक व स्तुत्य उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका व्हळगळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक प्रविण लटके यांनी केले.
यावेळी बोलताना चेअरमन विलास कदम यांनी सांगितले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी बलिदान व प्राणाची आहुती दिली. प्रसंगी फासावर चढले, हा त्याग आणि देशप्रेम आजच्या पिढीने लक्षात ठेवला पाहिजे. सामाजिक संस्था व संघटना आणि नेतेमंडळींनी अशा विशेष दिनाचे औचित्य साधून गोरगरीब लोक व गरजू विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे. आपण मिळवलेल्या पैशातून समाजासाठी विधायक उपक्रम राबविल्यास त्यामधून आत्मिक समाधान लाभते. भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व सामूहिक गीते, मनोगते आणि आकर्षक पद्धतीने सादर केलेल्या कवायतींच्या विविध प्रकारातून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिलेल्या खाऊचे वाटप केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील खोत यांनी केले तर, आभार तुकाराम कापसे यांनी मानले.
यावेळी सरपंच राजेंद्र खोत, केंद्रप्रमुख रोहिदास कापसे, चेअरमन शिवशंकर गवळी, वैजिनाथ व्हळगळ, उपसरपंच आण्णासाहेब कापसे, पोलीस पाटील नितीन बगडे, ग्रामसेवक संदीप सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव गवळी, भास्कर कदम, प्रकाश पारडे, अनंता बगडे, तुकाराम पालेकर, नेताजी गवळी, रोहिदास बगडे, तनुजा तांबोळी, शिवाजी भोगे, सचिन क्षीरसागर, सुधीर टोणगे, दत्तात्रय लटके, विष्णू कापसे, श्रीरंग बगडे, अंकुश कापसे, बबन पवार, विजय व्हळगळ, बाबासाहेब घोलप, विकास कापसे, किरण भालेकर, योगेश पवार, लहू जगताप, बबन बगडे, मारुती लटके, नामदेव बगडे, संतोष चव्हाण, महादेव सदगर, मच्छिंद्र पवार, लहू गवळी, सागर राजगुरू यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! The author’s perspective was fascinating and left me with a lot to think about. Let’s discuss further. Click on my nickname for more thought-provoking content!