Uncategorizedताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा माळशिरस तालुका दौरा जाहीर…

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील पहिल्या गोल रिंगणाकडे पालकमंत्री यांनी पाठ फिरवली होती. त्याकडे बांधकाम मंत्री वाट वाकडी करून पाहणी करतील का ?

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री नामदार श्री. रवींद्र चव्हाण यांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्ग व वारकरी व्यवस्था नियोजन दौरा पुणे, सातारा, सोलापूर, जिल्हा दौरा कार्यक्रम जाहीर झालेला असून माळशिरस तालुक्यात दुपारी 4.20 वाजता मोटारीने आगमन होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा शुक्रवार दि. 09 जुन 2023 रोजी सकाळी 07 पालवा डोंबिवली निवासस्थान येथून मोटारीने पुण्याकडे रवाना झाले आहेत. शासकीय विश्रामगृह पुणे येथून मोटार येणे पालखी मार्गाने सासवड, जेजुरी, वाल्हे, निरा लोणंद, फलटण, बारामती, सणसर मार्गे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात दुपारी 04.20 वाजता नातेपुते येथे आगमन होणार आहे. नातेपुते येथील पालखी मुक्कामाची व्यवस्था पाहणी व चर्चा पुरंदावडे येथे माऊलींच्या गोल रिंगणाची व्यवस्था पाहणी, माळशिरस येथे पालखी मुक्कामाची व्यवस्था, वेळापूर येथे पालखी विसावा व मुक्कामाची व्यवस्था पाहणी व चर्चा तोंडले बोंडले करून पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथून रात्री 10 वाजता पालवा डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण होणार आहे. असा नियोजित दौरा मंत्री महोदय यांचे खाजगी सचिव ए. का. गागरे यांनी जाहीर केलेला आहे.

महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालच गुरुवारी असाच दौरा केलेला होता. मात्र, पालकमंत्री यांनी माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे, सदाशिवनगर येथील पहिले गोल रिंगण असणाऱ्या पालखी रिंगण सोहळ्याच्या मैदानास भेट न देता पाठ फिरवून गेलेले होते. त्यामुळे स्थानिक नागरिक व भाविक यांच्यामधून तीव्र नाराजीचा सूर उमटलेला होता. आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या मार्गाची पाहणी दौरा आहे. त्यामध्ये पहिल्या गोल रिंगण मैदानास पालकमंत्री यांनी पाठ फिरवलेल्या जागेला भेट देऊन जागेची पाहणी करतील का ? असा सवाल स्थानिक नागरिक व भाविकांमधून उपस्थित केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button