सावंत कुटुंबीयांनी जनसेवेचा वसा अखंडपणे चालू ठेवला – पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे साहेब
माळशिरस (बारामती झटका)
आज माळशिरस येथे लोकनेते माजी उपसरपंच माळशिरस, माजी जिल्हा परिषद सदस्य व सोलापूर जिल्हा नियोजन मंडळ सदस्य कैलासवासी भीमराव सावंत यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा उपकेंद्र, माळशिरस या ठिकाणी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र टाकणे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर होते. तर, नगरसेवक आबा धाईंजे, आकाश सावंत, अभिजीत पाटील, माळशिरस तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, आकाश पाटील, समाधान भोसले, धनाजी पवार, मतीन बिद्रे, माळशिरस भाजपा शहर उपाध्यक्ष राजेंद वळकुंदे, लखन सावंत, बापूराव क्षीरसागर, गहिनीनाथ वाघमारे, साजिद तांबोळी, अमोल वाघमोडे, अॅड. गणेश सिद, दत्ता शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे साहेब यांच्या शुभहस्ते रुग्णालयातील कर्मचारी व अधिकारी यांचा शाल व फेटा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना म्हणाले की, भीमराव सावंत यांच्या पश्चात सावंत कुटुंबीयांनी सर्वसामान्य जनतेशी असणारी नाळ आजही अखंडपणे चालू ठेवली आहे त्यांच्या पश्चात पत्नी, नगराध्यक्ष लक्ष्मी सावंत, मुलगा नगरसेवक आकाश सावंत व सावंत कुटुंबीयांनी जनसामान्याशी असणारी त्यांची नाळ आजही अखंडपणे सुरू ठेवली आहे.
राजकारणाबरोबर समाजकारण हे ब्रीदवाक्य त्यांनी आज खरे करून दाखवले आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून ते समाजसेवेत अग्रेसर आहेत. यावेळी सर्व निदान आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याने अनेक रोगांवरती उपचार व तपासणी करण्यात येणार होती. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण उपस्थित होते.
यावेळी बोलताना किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी कुणाल धाईंजे, हर्षद धाईंजे, यशवंत मोहिते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय साठे यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng