सुरेशआबा पालवे व अक्षय भैय्या भांड अजितदादांच्या खळ्यात, तर इतर पदाधिकाऱ्यांचे तळ्यात मळ्यात.

माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे प्रदेश, जिल्हा, तालुका कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची भूमिका पवारसाहेब, की अजितदादा, गुलदस्त्यात आहे.
माळशिरस ( बारामती झटका )
संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घ्यावे अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांचे पवार साहेब व अजित दादा यांच्या समर्थनार्थ मेळावे, पाठिंबा, प्रतिज्ञापत्र असे सुरू असताना माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश, जिल्हा व तालुका कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची भूमिका पवार साहेब, की अजित दादा, अशी असून ते अजून गुलदस्त्यात आहे. सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नीरा उजवा कालवा समितीचे माजी सदस्य अजित दादा फाउंडेशनचे संस्थापक सुरेशआबा पालवे पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव व नातेपुते नगरीचे युवा नेते अक्षयभैया भांड या दोन अजितदादा निष्ठावान नेत्यांनी अजितदादांना समर्थन देऊन अजितदादांचे राजकीय पीक जोमात आणण्याकरिता अजितदादांच्या पक्षीय खळ्यामध्ये उडी घेतलेली असल्याने दादांच्या निष्ठावानामध्ये सुरेशआबा पालवे व अक्षयभैय्या भांड यांची वर्णी लागलेली आहे.
सुरेशआबा पालवे व अक्षयभैय्या भांड यांनी प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे व अजितदादा पवार यांना कायम साथ देऊन पाठीशी राहिलेले आहेत. अजितदादा पवार यांच्या राजकीय भूमिकेनंतर राष्ट्रवादीत संभ्रमावस्था असताना माळशिरस तालुक्यातील अजितदादांचे खंदे समर्थक सुरेशआबा पालवे व अक्षयभैय्या भांड यांच्या राजकीय भूमिकीविषयी तालुक्यात व राज्यात चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng