Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

सुषमा अंधारे यांची नौटंकी संपूर्ण महाराष्ट्र ओळखत असून ही नौटंकी बंद करावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा इशारा

सुषमा अंधारे यांनी नौटंकी बंद करावी, भाडोत्री भोंगा जास्त दिवस चालत नसतो; जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची बोचरी टीका

करमाळा (बारामती झटका)

आमदारकीचा तुकडा मिळवण्यासाठी आंधळे झालेल्या अंधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकार्यावर खालच्या पातळीवर टीका करून उद्धव ठाकरे यांचे भाट म्हणून काम करत आहेत. या कामाची सुपारी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून घेतली आहे. त्यांची नौटंकी संपूर्ण महाराष्ट्र ओळखत असून आताही त्यांनी नौटंकी बंद करावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिला आहे.

जिल्हाप्रमुख महेश चिवटे पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, सुषमा अंधारे 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत होत्या. शरद पवारची कशी देशाला गरज आहे, हे गळा उकलून संपूर्ण महाराष्ट्राला सांगत होत्या. मात्र, आता त्या यू टर्न घेऊन थेट उद्धव ठाकरे यांचे समर्थन करत थेट ज्यांचा उभ्या आयुष्यात प्रसंग आला नाही अशा शिंदे गटांच्या नेत्यावर खालच्या पातळीवर टीका करत आहेत

उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर दहीहंडीच्या दरम्यान खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे आता जनाब शरदनिष्ठ सोनियानिष्ठ व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची गद्दारी करणारे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे कसे देशाचे भाग्यविधाते आहेत, हे समाजाला पटवून देत आहेत. ही संपूर्ण आमदारकी मिळवण्यासाठी चाललेली नोटंकी आहे.

गेली तीस वर्ष सुपारी घेऊन व्याख्यान करूनसुद्धा लोकप्रियता मिळाली नाही. सत्तेचा तुकडा मिळाला नाही, कुठे गेले तर मानसन्मान मिळत नाही, याची खंत बोचत असल्यामुळे अंधारे यांनी महाराष्ट्रासाठी उभे आयुष्य खर्च केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, तानाजीराव सावंत, शहाजी बापू पाटील यासारख्या महाराष्ट्रातील नावाजलेल्या महत्त्वाच्या नेत्यावर टीका करून स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे.

सुषमा अंधारे यांनी आपल्या मागील राजकीय, सामाजिक, आयुष्यात प्रभू श्रीरामाचा अपमान केला. राम मंदिराची चेष्टा केली, राम भक्त हनुमानाची माकड म्हणून चेष्टा केली, आई जगदंबेच्या नवरात्र उत्सवाची चेष्टा केली, हिंदू धर्माच्या सर्वच उत्सवाची चेष्टा करून सभेतून टाळ्या मिळवल्या. आता ह्या सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंना हिंदुत्व व निष्ठा शिकवत आहेत, हा खरा मोठा हास्यविनोद आहे.

ते भाषण करत असताना करीत असलेले हावभाव एखाद्या फिल्मी ऍक्टर सारखे असून त्यांनी आता राजकीय सभेतून भाषणे करण्यापेक्षा हास्यसम्राट सारख्या कार्यक्रमात मिमिक्री केली तर ते योग्य ठरेल, उद्धव ठाकरे यांची मातोश्री म्हणजे सध्या भंगारचे दुकान झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातून भंगारत निघालेली पुढारी नेते मंडळी समाजसेवक यांचे आश्रय घेण्याचे स्थान म्हणजे मातोश्री झाले आहे.

सुषमा अंधारे या शरद पवारांच्या इशाऱ्यावर उद्धवसेनेत दाखल झाले असून केवळ भाजप व हिंदुत्वादावर टीका करायची, याची सुपारी शरद पवारांनी दिलेली आहे. जेणेकरून उद्धव ठाकरे कायमस्वरूपी हिंदुत्ववादी विचारापासून दूर गेले पाहिजेत, यासाठी शरद पवारांनी आखलेले हे मोठे कटकारस्थान आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडताना सुषमा अंधारे असे सांगायच्या की, एक वेळ मृत्यू स्वीकारेल पण मी माझा विचार बदलणार नाही. पण सध्या सुषमा अंधारे यांच्या वागण्यामुळे खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या जनतेमध्ये सुद्धा संतापाची लाट उसळली आहे.

राम-लक्ष्मण-सीता ही काल्पनिक पात्र आहेत. रामायण महाभारत ही तीन टक्के ब्राह्मणांनी रचलेली थोतांड कथा आहे, अस सांगणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आता श्रीरामाचे अस्तित्व मान्य केले आहे, रामभक्त हनुमानाचे अस्तित्व मान्य केले आहे, आई जगदंबेचे अस्तित्व मान्य केले आहे. हिंदू धर्म की बात करेगा वही देशपर राज करेगा, हे तत्त्व मान्य केले आहे.

याबद्दल सुषमा अंधारे यांचे हिंदू प्रेमी जनतेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. मात्र, ही त्यांची भूमिका शेवटपर्यंत त्यांनी अशीच ठेवावी अन्यथा आमदारकीचा तुकडा नाही मिळाला तर पुन्हा आमचे हिंदू देवतांना शिव्या शाप देण्याची सुरुवात करू नये, अशी माफक अपेक्षा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी अंधारे यांच्याकडून व्यक्त केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button