सोलापूर जिल्हा तालीम संघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी श्रीनिवास कदम पाटील यांची नियुक्ती.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष व सोलापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे संस्थापक अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त काका पवार यांच्या उपस्थितीत निवड केली.
महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील व मांडकी गावचे डबल सरपंच सुकुमार उर्फ किरण माने पाटील त्यांच्या कार्यक्रमात निवड करण्यात आली.
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष व सोलापूर जिल्हा तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणेचे संस्थापक अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त काका पवार यांच्या उपस्थितीत बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल चे संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांची सोलापूर जिल्हा तालीम संघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड केली. यावेळी सोलापूर जिल्हा तालीम संघाचे सचिव पै. भरत मेकाले, कार्याध्यक्ष वामनभाऊ उबाळे, उपाध्यक्ष सर्जेराव चौरे, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, खजिनदार महादेव ठवरे, माधव भंडारी, रामभाऊ बेणे, मारुती वाकडे, महेश कुलकर्णी, आप्पा साखरे, विलास कंडरे, ज्ञानेश्वर पालवे, नारायण माने आदि तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांसह सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालीम यांचे वस्ताद, महान मल्ल कुस्ती शौकीन व पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राची 65 वी राज्यस्तरीय अजिंक्य पद अधिवेशन महाराष्ट्र केसरी किताब लढतीसाठी सोलापूर जिल्हा महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन माळशिरस पंचायत समितीचे ज्येष्ठ सदस्य गौतमआबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील व मांडकी गावचे डबल सरपंच सुकुमार उर्फ किरण माने यांनी सोलापूर जिल्हा निवड चाचणीचे आयोजन माळशिरस शहरातील सर्टिफाइड मैदानावर आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी श्रीनिवास कदम पाटील यांची निवड केली आहे. यावेळी जिल्हा निवड चाचणीचे सर्व उपस्थित मान्यवर, पंचमंडळी, कुस्ती शौकीन, पैलवान व कुस्तीचे उत्कृष्ट समालोचन करणारे पै. धनाजी मदने पुळुज, पै. हनुमंत शेंडगे मांडवे, सदाशिवनगर पै. युवराज केचे गार अकोले उपस्थित होते.
श्रीनिवास कदम पाटील यांच्या निवडीची घोषणा होताच डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व अर्जुन वीर पुरस्कार प्राप्त काका पवार यांनी भावी वाटचालीस व कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून श्रीनिवास कदम पाटील यांचे अभिनंदन केले.
बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेलच्या माध्यमातून अनादी कालापासून सुरू असलेली कुस्तीची परंपरा घराघरात पोचविण्याचे काम केलेले आहे. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व जिल्हा तालीम संघाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून कुस्तीची प्रसिद्धी करण्यासाठी सर्व वस्ताद मंडळी व पैलवान यांनी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी मोबाईल व व्हाट्सअप नंबर 9850104914 यांच्याशी संपर्क साधून आपण केलेल्या कुस्ती क्षेत्रातील प्रसिद्ध करण्याकरता संपर्क साधावा असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.