Uncategorized

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा माळशिरस तालुका दौरा जाहीर…

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे व वारकरी व्यवस्था नियोजन दौऱ्याचे आयोजन..

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्ग व वारकरी व्यवस्था नियोजन दौरा पुणे-सातारा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम जाहीर झालेला असून माळशिरस तालुक्यात दुपारी ३ वाजता मोटारीने आगमन होणार आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गुरुवार दि. ८ जुन २०२३ रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी शासकीय विश्रामगृह पुणे येथून मोटार येणे, पालखी मार्गाने सासवड जेजुरी-वाले-निरा-लोणंद-फलटण-बारामती-सणसर-बेलवाडी-वालचंदनगर मार्गे माळशिरस तालुक्यात दुपारी ३ वा. नातेपुते येथे आगमन होणार आहे. नातेपुते येथील पालखी मुक्कामाची व्यवस्था पाहणी व चर्चा, पुरंदावडे येथे माऊलींच्या गोल रिंगणाची व्यवस्था पाहणी, माळशिरस येथे पालखी मुक्कामाची व्यवस्था, वेळापूर येथे पालखी विसावा व मुक्कामाची व्यवस्था पाहणी व चर्चा, तोंडले-बोंडले करून पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.

पंढरपूर येथे मुक्काम होणार आहे, असा नियोजित दौरा विशेष कार्यअधिकारी डॉ. यशवंतराव माने यांनी जाहीर केलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort