सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
जिल्हा संपर्कप्रमुख प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी
करमाळा (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात गेली दोन दिवसात अचानक झालेला ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा, केळी, फळबागा, सोयाबीन, उडीद, तुर पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्याचे तात्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसानीचे आकडे मागून घ्या असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आज मुंबई येथे नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, महेश चिवटे, चरण चवरे, मनीष काळजी उपस्थित होते.
त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या मोबाईल क्लिप थेट प्रा. शिवाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री यांना दाखवल्या. यावेळी तात्काळ मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

यावेळी करमाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मंजूर केलेली 45 लाख तसेच प्रशासकीय इमारत दोन कोटी व टाऊन हॉलसाठी तीन कोटी रुपये या निधीला स्थगिती दिली असून ही स्थगिती उठवावी असे निवेदन महेश चिवटे यांनी दिले.
सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र शिवसेना मंत्र्याकडे जबाबदारी द्यावी, अशी मागणी अमोल बापू भोसले यांनी केली. तसेच नियोजन मंडळ व इतर समित्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नेमणूक देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी मनीष काळजी यांनी केली.

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची मोबाईलवर केलेली चित्रफीत प्रा. शिवाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवल्यानंतर त्यांनी ती शांतपणे दोन मिनिटे पाहिली व तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना समक्ष फोन करून सोलापूर जिल्ह्यातील पंचनामे करण्याचे आदेश दिले.
मोहोळ तालुक्यातील रखडलेल्या विकास कामासाठी निधी देण्याची मागणी चरण चवरे यांनी केली.
या बैठकीनंतर बोलताना प्रा. शिवाजीराव सावंत म्हणाले की, पुढील आठवड्यात पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील प्रश्नांची यादी त्यांच्यापुढे मांडणार असून येणाऱ्या काळात जास्तीत जास्त विकासाची कामे सोलापूर जिल्ह्यात करून घेऊ, असा विश्वास प्रा. शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng