सोलापूर मेडिकल असोसिएशनमध्ये दीपक पाटणे यांचा सत्कार
करमाळा (बारामती झटका)
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा तालुका अध्यक्षपदी दीपक पाटणे यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर मेडिकल असोसिएशनच्या कार्यालयात पाटणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष बसवराज मनोरे, सचिव राज शेखर, बारोळे कोषाध्यक्ष राजीव वीरपे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष गंगाधर कापसे, माळशिरस तालुका अध्यक्ष प्रद्युम्न गांधी आदी उपस्थित होते.
दीपक पाटणे करमाळा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष असून त्यांनी विविध आरोग्य शिबिरे घेऊन गरजूंना मोफत औषधी उपलब्ध करून दिले आहेत.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बसवराज मनोरे म्हणाले की, आज एक मेडिकल विक्रेता एका नावाजलेल्या सामाजिक संस्थेचा तालुकाध्यक्ष झाला असून मेडिकल क्षेत्रात पाटणे यांना असलेल्या माहितीमुळे गरजू रुग्णाला अत्यल्प दरात मेडिसिन औषध उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे.
यावेळी बोलताना दीपक पाटणे म्हणाले की, मेडिकल व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी ठेवून गरजू रुग्णांना अत्यल्प दरात चांगल्या दर्जाची औषधे देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता पक्षाच्या माध्यमातून रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng