सोलापूर सातारा हद्दीवरील भांब इसबावी घाट रस्ता जिल्हा परिषदेकडून बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावा – बाळासाहेब सरगर.
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर व सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा ग्रामीण भागातून जाणारा माळशिरस तालुक्यातील कन्हेर, रेडे, गिरवी, इस्लामपूर, माणकी, मांडवे, जाधववाडी या गावातील लोकांना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधील इंजबाव, खुटबाव, रांजणी, मोटेवाडी व गोंदवले या ठिकाणी जाण्यासाठी एक तर नातेपुते मार्गे किंवा म्हसवड मार्गे जावे लागते. परंतु, हा रस्ता झाला तर ह्या गावातील लोकांना दहा किलोमीटर अंतर कमी होणार आहे. शिवाय सध्या माणकी, रेडे ते नातेपुते या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
शिवाय निमगाव ते फरतडी हे सुद्धा काम प्रगतीपथावर चालू आहे. या घाट रस्त्याचे काम पूर्वी झाले होते. परंतु जागोजागी वळण असल्याने व पावसाचे पाणी जाण्यासाठी पाईप न टाकल्याने रस्ता वाहून जात होता. त्यामुळे जाण्यायेण्यास अडचण होत होती. या रस्त्यासाठी जादा निधी टाकण्याची मागणी यापूर्वी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आ. राम सातपुते व आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांचेकडे केली होती.

परंतु, हा रस्ता जिल्हा परिषदेकडे असल्याने मोठ्या प्रमाणात निधी टाकता येत नाही. त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यास निधीची कमतरता भासणार नाही. शिवाय राज्यामध्ये भाजपचे सरकार आल्याने हा रस्ता निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी हा रस्ता जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात यावा, याबाबतचे पत्र उप अभियंता अशोक रणवरे साहेब यांना भाजपा किसन मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी दिले.
त्यांनी यापूर्वी प्रस्ताव दिला होता. अपूर्ण त्रुटी पूर्ण करून लवकरच हा प्रस्ताव पुन्हा पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन अभियंता अशोक रणवरे यांनी दिले. अभियंता अशोक रणवरे हे माणकी गावचे रहिवाशी असून त्यांना या भागाबाबत पूर्ण कल्पना असल्याने रस्ता मार्गी लागेल, असा आशावाद बाळासाहेब सरगर यांनी यावेळी व्यक्त केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

