सौ. सारिका माळी यांची पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक रासायनिक विश्लेषक पदाला गवसणी

पिलीव (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधील सहाय्यक रासायनिक विश्लेषक या पदाला सारिका ज्ञानेश्वर माळी यांनी पहिल्याच प्रयत्नात गवसणी घातली आहे. सारिका माळी यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तर आटपाडी येथील आबासाहेब खेबुडकर जुनिअर कॉलेज येथे अकरावी बारावी झाली. त्यानंतर बीएससी एस.पी कॉलेज, पुणे येथे झाले तर एमएस्सी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मध्ये झाले.
सारिका माळी यांचे पती ज्ञानेश्वर दत्तात्रय माळी यांची पिलीवसह सोलापूर, पुणे, मुंबई तसेच देशभर प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर म्हणून ओळख आहे. तर सारिका यांचे दिर तुषार दत्तात्रय माळी हे मुंबई येथे एसटीआय आहेत. वडील दत्तात्रय माळी सेवानिवृत्त एसटी ड्रायव्हर व आई अंगणवाडी सेविका आहे. त्यामुळे सारिका माळी यांची पिलीव परिसरामध्ये साक्षर व सुशिक्षित कुटुंबाची सून म्हणून ओळख आहे.
एखादी व्यक्ती यशस्वी झाली तर त्या व्यक्तीला वारंवार प्रश्न विचारला जातो की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो. मी ठामपणे सांगू इच्छिते की, माझ्या यशाच्या मागे माझे पती ज्ञानेश्वर दत्तात्रय माळी यांचे खूप मोठे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे, असे सारिका यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सारिका यांच्या उत्तुंग यशाबद्दल पिलीवसह परिसरातील विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng