Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

स्पर्धेच्या युगामध्ये गणिताला खूप महत्त्व आहे – अनंतलालदादा दोशी

मांडवे (बारामती झटका)

दि. 5 मे 2023 रोजी फर्स्ट नॅशनल ॲबॅकस ऑलम्पियाड ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यामध्ये निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करणयात आला. त्यामध्ये सुपर ब्रेन ॲकॅडमीच्या इयत्ता तिसरीतील चि. भाग्येश बंडगर या विद्यार्थ्यांने 4 मिनिटामध्ये 100 गणिते सोडवली व इयत्ता 4 थी मधील चि. ईशान शिद या विद्यार्थ्यांने 99 गणिते सोडवली. तसेच कु. ईश्वरी कळसुले, चि. ईशान फडे, कु. ज्ञानेश्वरी वाघमोडे, कु. कल्याणी देवकर, कु. आरुषी गाडेकर हे सुपर ब्रेन ॲकॅडमीचे विद्यार्थी विनर ठरले.

या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमप्रसंगी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी व रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात बोलताना अनंतलाल दादा दोशी म्हणाले, आजच्या धावत्या व आधुनिक स्पर्धेच्या युगामध्ये गणिताला खूप महत्त्व आहे. एखाद्या गोष्टीचा हिशोब करणे ॲबॅकसमुळे सहजतेने शक्य झालेले आहे. ॲबॅकसमुळे मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर मुलांचा मानसिक विकास, बौद्धिक विकास, अभ्यासातील गती चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते. ॲबॅकसमुळे मुलांचा गणित सोडवण्याचा वेळ खूप वाचतो, हाताच्या बोटावर मुलं चांगल्या प्रकारे गणित सोडवू शकतात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे जे पायाभूत घटक आहेत त्यांचा सराव व त्यांच्यावरती असणारी गणिते हे विद्यार्थी ॲबॅकसमुळे सहजतेने अगदी कमी वेळात सोडवू शकतात आणि अशा प्रकारचे हे क्लासेस चांगल्या प्रकारे चालणं खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर संजीवनी वाघमोडे मॅडम क्लासेस घेत आहेत त्यांचे खरोखर कौतुक. कारण, अश्या प्रकारचे क्लासेस आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये सुरू करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. या क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये खरोखरच खूप मोलाचा बदल झालेला आपल्याला दिसून येईल. असे सांगून क्लासेससाठी आणि विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक गुणवत्तेसाठी शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमासाठी श्री. भानवसे सर, भगवान शिंदे सर, सौ. संगीता कदम मॅडम, श्री. हनुमंत कोळेकर सर, आर.टी.ओ. इन्स्पेक्टर, उस्मानाबाद श्री. अमित पाटील, श्री. वैभव जानकर नगरसेवक, श्री. रावसाहेब देशमुख, श्री. गोरख देशमुख, श्री. अशोक वाघमोडे, श्री. आनंद वाघमोडे, श्री. बाजीराव वाघमोडे, सौ. संजीवनी वाघमोडे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपर ब्रेन ॲकॅडमीची विद्यार्थ्यांनी कु. सोनाली वाघमोडे हिने केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort