स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उपोषणाला अखेर यश आले…
बालेवाडी (बारामती झटका)
दि. ९ मार्च २०२३ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. स्मार्ट सिटीतील बालेवाडी या गावातील शाळा क्रमांक १२१ व शाळा क्रमांक १५२ कै. बाबुराव शेठजी गेणू बालवडकर या शाळेतील सुविधांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभाराचा निषेध म्हणून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. किंबहुना त्यानंतरही महानगरपालिका आयुक्त व शिक्षणाधिकारी यांनी या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर काल रात्रीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण जाहीर केले. त्यानंतर संघटनेची आक्रमकता पाहून प्रशासनातील अधिकारी आज दि. १० मार्च २०२३ रोजी दुपारी उपोषण स्थळी आले. आम्ही केलेल्या सर्व मागण्या त्यांनी लेखी स्वरूपात मान्य केल्या व येणाऱ्या कालावधीमध्ये त्या मागण्या पूर्ण करण्याचं शाश्वत असं ठाम लेखी दिले.

या उपोषणाच्या काही प्रमुख मागण्या अशाप्रकारे होत्या –
१. शाळेसाठी नवीन इमारत द्यावी.
२. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खेळाचे ग्राउंड मिळावे.
३. सफाई कामगार देण्यात यावा.
४. पिण्याचे व वापरण्याचे पाणी पूर्णवेळ विद्यार्थ्यांना मिळावे.
५. एक मुख्याध्यापक नेमणूक करण्यात यावे.
६. शाळेसमोर गतिरोधक बसवावा.
या आंदोलनामुळे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय सोयी उपलब्ध होतील. शिक्षण घेत असताना मुलांना मिळणाऱ्या सर्व सोयी – सुविधा हीच माझ्या कामाची पावती असेल असे मी समजतो. सर्व पालक वर्ग, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समस्त ग्रामस्थ बालेवाडी या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. समाजासाठी हा लढा अविरत असाच चालू राहील. धन्यवाद…! – आपलाच प्रकाश किसनराव बालवडकर (प्रदेश उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य )

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng