Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुका संपर्क कार्यालयाचे शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या शुभहस्ते शुभारंभ.

महाराष्ट्रात सत्ता बदलानंतर पहिल्यांदाच माजी खा.राजू शेट्टी माळशिरस तालुका दौऱ्यावर, काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष…

माळशिरस (बारामती झटका )

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी उद्या माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी येणार आहेत. माळशिरस तालुक्यातील विझोरी (निमगावपाटी) पुणे -पंढरपूर रोड येथे उद्या शनिवार दि. ०२ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५ वा. उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी दिली आहे.

सदर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहाजानभाई शेख यांच्यासह माळशिरस तालुक्यातील जेष्ठ मान्यवर तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती माळशिरस तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितली.

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे समर्थन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढून घेतलेले होते. अशातच शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हातात घेतला आणि भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस बनलेले आहेत. काल दि. ३० जून रोजी शपथविधी झालेला आहे. नंतर दोनच दिवसात शेतकऱ्यांचे खासदार माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत, या दौऱ्यावेळी ते काय बोलणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button