Uncategorizedताज्या बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सदाशिवनगर-पुरंदावडे उड्डाणपूलाच्या रास्ता रोकोसाठी जाहीर पाठिंबा.

पुरंदावडे व सदाशिवनगर ग्रामपंचायत आणि उड्डाणपूल संघर्ष समिती यांनी रास्ता रोको आयोजित केलेला आहे यासाठी विविध स्तरातून वाढता पाठिंबा…

सदाशिवनगर ( बारामती झटका )

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील पुरंदावडे सदाशिवनगर दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. दोन्ही गावातील ग्रामस्थांचे, व्यापारी व स्थानिक नागरिक यांचे म्हणणे आहे कि, उड्डाणपूल प्लेट ऐवजी कॉलमचा करावा. यासाठी दोन्ही गावातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी उड्डाणपूल संघर्ष समिती स्थापन केलेली आहे. पुरंदावडे व सदाशिवनगर ग्रामस्थ आणि उड्डाणपूल संघर्ष समिती यांचा दि. 23/7/2022 रोजी रास्ता रोको आहे.

यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय दादा भोसले यांनी शेतकरी संघटना व माळशिरस तालुका रत्नत्रय फाउंडेशन सदाशिवनगर यांच्यावतीने जाहीर पाठिंबाचे पत्र संघर्ष समितीतील सदस्यांकडे सुपूर्त केलेले आहे. उड्डाणपूल संघर्ष समितीच्या रास्ता रोकोसाठी अनेक स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort