Uncategorizedताज्या बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी मनपा आयुक्त विक्रमकुमार यांना दिले निवेदन

प्रभाग क्र. ९ आणि १० मध्ये पाणीटंचाई टँकर माफियांचा सुळसुळाट

पुणे (बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश किसनराव बालवडकर यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार साहेब यांना प्रभाग क्र. ९ आणि १० मध्ये पाण्याची असणारी टंचाई आणि टँकर माफियांचा सुळसुळाट याविषयी निवेदन दिले आहे.

सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, या भागामध्ये अनेक महिन्यांपासून पाण्याचा गंभीर प्रश्न चालू असून पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने होत नाही. याबाबतीत आपल्या विभागातून अधिकारी वर्ग उदासीन आहेत. पाण्यासाठी लोकांना बाहेर जावे लागत आहे, त्यामुळे टँकर माफियांचा सुळसुळाट झाला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या व पाणी टँकरमध्ये भरून देणाऱ्या विभागाकडे कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही.

अत्यंत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू आहे. मात्र, लोकांना आपल्या भागात आपल्या अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. तरी वरील प्रश्नाचा गांभीर्याने विचार केला नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही भव्य हांडा मोर्चा आपल्या ऑफिस वरती आणणार आहोत याची दखल घ्यावी.

प्रभाग क्र. ९ बालेवाडी, बाणेर, सुस, माळुंगे या भागातील पाण्याचा गंभीर प्रश्न या समस्येवरती लवकर तोडगा काढला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे, ही पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर आयुक्त पुणे महानगरपालिका यांनी ताबडतोब या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन आज सकाळी अर्जंट साडेदहा वाजता पुणे महानगरपालिकेत या विषयावरती तातडीची बैठक बोलावली आहे.

यासंदर्भात सर्वांनी लोकहितासाठी आवाज उठवावा, सहकार्य करावे अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button