Uncategorized

हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असणारे वश्या मारुती मंदिर परिसर विकासकामांना गती…

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून मंदिर परिसर सुशोभित व विकसित

सदाशिवनगर ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मारकडवाडी ग्रामपंचायत हद्दीत तामसिदवाडी व सदाशिवनगर गावांच्या सीमेलगत असणारे स्वयंभू जागृत भाविक भक्तांना नवसाला पावणारा हनुमान आहे. त्याची ओळख वश्या मारुती म्हणून आहे. हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असणारे वश्या मारुती मंदिर परिसर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून सुशोभित व विकसित होत आहे. त्यांच्यामुळे विकासकामांना गती मिळालेली आहे.

मारकडवाडी व तामसिदवाडी गावच्या सरहद्दीवर गोरे वस्ती येथे स्वयंभू जागृत मारुती मंदिराचे स्थान आहे‌. गोरे वस्ती व आसपासच्या भाविक भक्तांनी मंदिराचे भव्य शिखर व सभामंडप स्वखर्चाने लोकवर्गणीतून बांधलेला आहे. आकर्षक शिखर डिझाईन, मंडपाचे डेरेदार बांधकाम आणि मारुतीचे पावित्र्य या सर्व गोष्टी गोरे वस्ती येथील हनुमान भक्त मनापासून करत आहेत.

या मंदिरात वर्षातून दोन-तीन वेळा मोठे उत्सव असतात. यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे सुद्धा आयोजन केले जाते. विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. संगीताताई संजय मोटे यांनीही वश्या मारुती मंदिर परिसरात विकास कामे केली आहेत. वश्या मारुती मंदिराच्या आसपास बाजूने ओढा व समोरच्या बाजूला गायरान सामाजिक वनीकरणाची जागा आहे. या जागेत माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी 3333 वृक्षांची लागवड करून मंदिर परिसर सुशोभीकरण व विकसित करण्यास सुरुवात केली. मंदिर परिसरात भाविकांना बसण्यासाठी कठडे बांधले आहेत. संरक्षक भिंत बांधलेली आहे‌. उजेडासाठी हायमास्ट दिवा आहे. भाविकांना मंदिराच्या समोर धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद घेण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवलेले आहेत.

दिवसेंदिवस भाविकांची वश्या मारुतीविषयी श्रद्धा वाढत आहे. शनिवारी व इतर वारी सुद्धा आसपासच्या गावातील लोक दर्शनासाठी येत असतात. निसर्ग रम्य मंदिर परिसर असल्याने पर्यटन ठिकाणाची वाटचाल सुरू आहे. वश्या मारुती मंदिरास ‘ब’ वर्ग दर्जा देण्याचे काम सुरू आहे.

सध्या मंदिर परिसरात 40 बाय 100 असे भव्य सभामंडप उभारण्याचे काम सुरू आहे. त्याच्या दोन्ही बाजूला दोन रूम तयार करून लग्न समारंभ सुद्धा सदरच्या भव्य हॉलमध्ये होऊ शकतात. मारुतीचे धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांना सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे‌. निसर्गरम्य ठिकाण असल्याने मंदिर विकास परिसर करीत असताना मंदिराच्या पाठीमागे ओढ्यावर बंधारा आहे‌. सदर ठिकाणी बोटिंग करण्याच्या प्रयत्नाला अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. लहान मुलांना खेळणी तयार केली जाणार आहेत. आसपासच्या भागातून मारुतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना दळणवळणाची सुविधा रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. भविष्यामध्ये माळशिरस तालुक्यात पर्यटन स्थळांमध्ये वश्या मारुतीचे मंदिर होऊ शकते.

अशा पद्धतीने मंदिर सुशोभित व विकसित करण्याचे काम सुरू आहे. गोरे वस्ती वरील सर्व बागायतदार, शेतकरी, कामगार व मोलमजुरी करणारे यांनी सुद्धा आपापल्या परीने मंदिर कळस व सभामंडप बांधण्यासाठी आर्थिक मदत केलेली आहे. सर्व धार्मिक उत्सवामध्ये सर्वांचा सहभाग असतो. गोरे वस्ती येथील हनुमान भक्तांच्या सहकार्यामुळे मंदिर परिसर विकसित होत आहे.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून विकासकामांना गती मिळालेली आहे‌. हनुमान भक्त हरिभाऊ पालवे यांनी माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा परिषद सदस्य संगीताताई मोटे यांच्या निधीतून मंदिराच्या विकास कामांना सुरुवात केलेली होती. गतिमान विकास माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून सुरू आहे‌. विशेष म्हणजे वश्या मारुतीचे भक्त असणारे हरिभाऊ पालवे तिन्ही लोकप्रतिनिधीकडे विश्वासू सहकारी म्हणून काम पाहत आहेत. मनामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना पूर्ण होतील, असा हनुमान भक्तांना आशावाद आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. Wow, amazing weblog layout! How lengthy have you been blogging for?
    you made running a blog look easy. The total glance of your website is magnificent, as smartly as
    the content! You can see similar here dobry sklep

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button