Uncategorizedताज्या बातम्या

ह.भ.प. अमोल सुळ महाराज मोरोची यांच्या गोरडवाडी येथे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम.

माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती स्व. माणिकराव बाबासो कर्णवर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन

मोहिते पाटील यांच्या तीन पिढ्यांसोबत एकनिष्ठ राहिलेले माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील बुजुर्ग नेते होते.

माळशिरस ( बारामती झटका )

गोरडवाडी ता. माळशिरस या गावचे, मोहिते पाटील परिवाराच्या तीन पिढ्यांसोबत एकनिष्ठ राहिलेले थोर सुपुत्र बुजुर्ग नेते स्व. माणिकराव बाबासो कर्णवर पाटील उर्फ माणिकबापू यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शनिवार दि. 23/07/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अमोल सुळ महाराज, मोरोची यांचे सुश्राव्य किर्तन गोरडवाडी म्हसवड रोडवरील कर्णवर पाटीलवस्ती येथे होणार आहे. तरी मित्र परिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे श्रीमती बाई माणिकराव कर्णवर पाटील, श्री. नवनाथ माणिकराव कर्णवर पाटील, श्री. मच्छिंद्र माणिकराव कर्णवर पाटील, चि. योगेश दाजीराम कर्णवर पाटील आणि समस्त कर्णवर पाटील यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार युवा नेते रणजीतसिंह मोहिते पाटील अशा मोहिते पाटील परिवारातील तिन पिढ्यांसोबत सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध असणारे माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील बुजुर्ग नेते माणिकबापू हे होते.इस्लामपूर गोरडवाडी संयुक्त ग्रामपंचायतीचे ते पाच वर्ष पहिले सरपंच होते.

गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित गोरडवाडी या संस्थेवर 35 वर्ष चेअरमन पदाची धुरा सांभाळली. माळशिरस पंचायत समितीचे सलग अकरा वर्ष उपसभापती पदावर कार्यरत होते. सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर त्यांनी पाच वर्ष काम केलेले आहे. श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर येथे पाच वर्ष संचालक पदावर होते. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज येथे पाच वर्ष उपसभापती पदावर कार्यरत होते.माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी होते. माणिक बापूंनी आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी केलेला आहेत. प्रतिकूल परिस्थितीत अनेक पदावर काम करण्याची संधी एकनिष्ठपणामुळे मिळालेली आहे.

मोहिते पाटील यांच्या राजकीय चढउतारांमध्ये कायम माणिकबापू सोबत राहिलेले आहे.विजयदादा शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाचे दर्शन घेऊन माळशिरस पंचायत समिती येथे अचानक आलेले होते. त्यावेळेस काही कामानिमित्त माणिकबापू सुद्धा आलेले होते. विजयदादा यांनी पत्रकारांशी औपचारिक चर्चा करीत असताना माणिकबापूंना पाहिल्यानंतर केबिनमध्ये बोलावून घेतले. त्यावेळेस आस्थेने तब्येतीची चौकशी केली. त्यावेळेस माणिकबापूंचा शब्द होता, सर्व काही दादा आपल्यामुळे व्यवस्थित आहे.

अशी चर्चा सुरू असताना दादांना माणिकबापूंनी भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू आहेत, असे ऐकावयास मिळत आहे तर दादा तुम्ही जो निर्णय घेतला तो आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्याला मान्य असेल असे सांगून मोहिते पाटील यांना भाजपमध्ये जाण्यासाठी वयोवृद्ध बुजुर्ग व्यक्तींनी सुद्धा पाठिंबा दर्शविलेला पाहिला आहे‌. त्यावेळी पत्रकार सचिन करडे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष विजयकाका कुलकर्णी, बारामती झटका न्यूज चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी उपस्थित होते.

स्व.माणिकबापू यांचे कोरोना कालावधीत दुःखद निधन झालेले होते. अशा संसर्ग रोगाच्या प्रादुर्भावातसुद्धा विजयदादा यांनी माणिकबापूंच्या परिवारांचे सांत्वन करण्याकरता निवासस्थानी भेट दिलेली होती. विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा मुंबई येथून आल्यानंतर कर्णवर पाटील परिवारांची भेट घेतलेली होती. मोहिते पाटील परिवार आणि कर्णवर पाटील परिवार यांचे सलोख्याचे संबंध बापूंच्या पश्चातसुद्धा जपण्याचे काम सुरू आहे‌. माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील व गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक मच्छिंद्र कर्णवर पाटील यांच्या कायम भेटीगाठी सुरू आहे.

कोरोना संसर्ग रोगाच्या प्रादुर्भावामुळे लोकांना बापूंच्या अंत्यविधी रक्षाविसर्जन व दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहता आलेले नव्हते. सध्या कोरोना नियंत्रणात असल्याने प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मित्र परिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक मच्छिंद्र कर्णवर पाटील आणि समस्त कर्णवर पाटील परिवार यांनी केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort