आरोग्यताज्या बातम्या

ह.भ.प. गोविंद महाराज गोरे आळंदी यांचे सुश्राव्य कीर्तन भांबुर्डी येथे होणार .

आदर्श कुटुंबकर्ता स्वर्गीय तुळशीराम सुखदेव वाघमोडे यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन पुष्पवृष्टी महाप्रसादाचे आयोजन..

माळशिरस ( बारामती झटका )

भांबुर्डी तालुका माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार व आदर्श कुटुंबकर्ता स्वर्गीय तुळशीराम सुखदेव वाघमोडे उर्फ तात्या यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त गुरुवार दिनांक 20/04/2023 रोजी भांबुर्डी दुर्गादेवी मंदिराजवळ सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प गोविंद महाराज गोरे आळंदी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे कीर्तनानंतर पुष्पवृष्टी आरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे श्रीमती कमल तुळशीराम वाघमोडे श्री चांगदेव तुळशीराम वाघमोडे डॉक्टर दिलीप तुळशीराम वाघमोडे आणि समस्त भांबुर्डी तिरवंडी वाघमोडे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
भांबुर्डी येथील सर्वसामान्य शेतकरी असणारे सुखदेव वाघमोडे यांना मारुती विठ्ठल आणि तुळशीराम अशी तीन मुले होती. पूर्वीच्या काळी शेती शिवाय पर्याय नव्हता.

शिक्षणाचा प्रतिकूल परिस्थितीमुळे अभाव होता शिक्षणाशिवाय प्रगती नाही अशी मनामध्ये खूणगाठ बांधून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन तुळशीराम वाघमोडे उर्फ तात्या यांनी संकल्प केला आपली व आपल्या भावाची मुलं सुसंस्कृत करून पुढील पिढी आदर्श बनवायची या दृष्टीने त्यांनी 19 81 साली बेळगाव येथे भावाचा मुलगा डॉक्टर मोहन विठ्ठल वाघमोडे यांना ऍडमिशन घेऊन डॉक्टर बनवलेले आहे. तात्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. तात्यांचा आदर्श घेऊन नातवंडे यांनी सुद्धा शिक्षणामध्ये प्रगती करून सुसंस्कृत व सुशिक्षित पिढी तयार झालेली आहे तात्यांची मुलगी सुरेखा तानाजी काळे यांना तीन मुली एक मुलगा तिन्ही मुली डॉक्टर तर मुलगा बीएससी ऍग्री होऊन एलएलबी झालेले आहेत. तात्यांचा मुलगा चांगदेव यांना दोन मुले एक बीएससी ऍग्री तर दुसरा ग्रॅज्युएट झालेला आहे तात्यांनी मुलगा दिलीप यांना डॉक्टर केलेले आहे तर डॉक्टर दिलीप यांना दोन मुली एक मुलगी बी टेक तर दुसरी एमबीबीएस मुलगा बारावी त सध्या लातूर येथे आहे. तात्यांची मुलगी मंगल तानाजी शिंदे यांना दोन मुले एक बी मेकॅनिकल तर दुसरा बी टेक मेकॅनिकल दोन्हीही कंपनीत जॉबला आहे मुलगी कॉम्प्युटर ती सुद्धा जॉबला आहे असा सर्व परिवार सुसंस्कृत आहे तात्यांनी घालून दिलेला आदर्श आज सुद्धा वाघमोडे परिवार सांभाळत आहेत मारुती आणि विठ्ठल यांची सुद्धा मुले उत्कृष्ट शेती करीत आहेत वाघमोडे यांची शेती भांबुर्डे व तिरवंडी दोन्ही गावांमध्ये आहे अशा आदर्श कुटुंब करता असणारे स्वर्गीय तुळशीराम सुखदेव वाघमोडे उर्फ तात्या यांच्या प्रथम पुण्यस्मरणास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे घाई गडबडीत नजरचुकेने आमंत्रण अथवा निमंत्रण हस्ते पर हस्ते मिळाले नसल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे समस्त वाघमोडे परिवार यांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng.

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button