Uncategorized

७२ कोटींच्या वेळापूर पाणी पुरवठा योजनेस तत्त्वतः मंजूरी

विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश

अकलूज (बारामती झटका)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून व उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याने जलजीवन मिशन अंतर्गत ७१ कोटी ६३ लक्ष रूपयांच्या वेळापूर पाणी पुरवठा योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तत्त्वतः मंजूरी मिळाली असून सीपीडीएम (Centre for Product Design and Manufacturing) विभागाकडून तांत्रिक मंजूरी होऊन लवकरच प्रशासनाकडून ही योजना कार्यान्वित केली जाणार असून वेळापूरच्या जनतेचा पिण्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

सन २०५४ पर्यंत म्हणजेच पुढील तीस वर्षांचा विचार करून वेळापूरसाठी पाणी पुरवठा योजना होणार आहे. यामध्ये वेळापूर डीफोरच्या स्टार्टिंग पॉईंट येथून पंपाद्वारे पाणी उचलले जाणार असून तेथून 800 मीटर अंतरावर असणाऱ्या उंच टेकडीवर पंपशाफ्ट उभारले जाणार असून तेथून पाणी ग्राव्हीटेशनल फोर्सवेने पाणीसाठवण तलाव येथे आणले जाणार आहे.

पाणी साठवण तलावाची क्षमता वाढणार
सध्या असणाऱ्या पाणी साठवण तलावाची क्षमता ४४ ml लक्ष लिटर इतकी आहे याचे नूतनीकरण होऊन RCC बांधकाम होणार आहे त्यामुळे याची पाणीसाठवण क्षमता १३० ml लक्ष लिटर इतकी होणार आहे व जलशुद्धीकरण केंद्राचे देखील नूतनीकरण होणार आहे.

ग्राव्हीटेशनल फोर्सवे ने पाणी पुरवठ्याकरीता २२ मीटर उंचीची टाकी बांधली जाणार आहे तसेच सात नवीन टाक्या उभारण्यात येणार आहेत व तेथून वेळापूरला पाणी पुरवठा होणार आहे.

वेळापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या नवीन टाक्या –

१) गावठाण नंबर २ – २,७९,००० लिटर
२) शेख वस्ती – १,७७,००० लिटर.
३) शिक्षक काॅलनी – १,०६,००० लिटर
४) आद्धट मळा – ९५,००० लिटर
५) चव्हाण वस्ती – ८९,००० लिटर.
६) पवार वस्ती ७७,००० लिटर
७) बौद्धवाडा ७३,००० लिटर

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort