ताज्या बातम्या

हाजिनमा बेगम मोतीलाल बागवान यांचे दुःखद निधन…

अकलूज (बारामती झटका)

अकलूज ग्रामपंचायतीकडील माजी अधिकारी हाजी मोतीलाल माणिक भाई बागवान यांच्या पत्नी हाजीनमा बेगम मोतीलाल बागवान यांचे वयाच्या 62 व्या वर्षी अकलूज येथील सुजयनगर येथील त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने रविवार दि. 16/7/2023 रोजी निधन झाले.

त्या शांत स्वभावाच्या, मनमिळावू व धार्मिक वृत्तीच्या होत्या. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीकडील डाळिंब व्यापारी श्री. राजूभाई व श्री. इमरान भाई बागवान यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित जाण्याने आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे. अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. मदनसिंह मोहिते पाटील, उपसभापती श्री. मामासाहेब पांढरे, सचिव श्री. राजेंद्र काकडे यांनी शोक व्यक्त केला.

हाजिनमा बेगम मोतीलाल बागवान यांच्या आत्म्यास सदगती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचा तिसऱ्याचा विधी (ज्यारंत) मंगळवार दि. 18/7/2023 रोजी सकाळी 7.30 वाजता अकलूज येथील कब्रस्तान मध्ये होईल, असे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button