माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने केमिस्ट भवन अकलूज येथे गणेशोत्सवाची उत्साहात सुरुवात

अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यामध्ये पहिल्यांदाच माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने व नूतन अध्यक्ष श्री. विठ्ठल गायकवाड यांच्या संकल्पनेतून केमिस्ट भवन अकलूज याठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. केमिस्ट बांधवावरील विघ्ने दूर करून सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे तसेच केमिस्ट बांधवामधील एकी व ऐक्य वृद्धिंगत व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेऊन या वर्षीपासून केमिस्ट भवन याठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे मत नूतन अध्यक्ष श्री. विठ्ठल गायकवाड यांनी मांडले. त्यानुसार मंगळवार दि. 19/9/2023 रोजी मोठ्या थाटामाठात, ढोल ताशांच्या गजरात विधिवत पूजा करून गणपती बाप्पाच्या मूर्तीची केमिस्ट भवन याठिकाणी प्राणप्रतिष्ठापना झाली.


सदर उत्सव साजरा करण्यासाठी सतीश चव्हाण, शेखर गाडेकर, प्रवीण माने देशमुख, नितीन दोषी, नितीन गायकवाड, उमेश शिंदे, शंकर पवार, रवी जगताप, विजय जगताप, अमोल अडगावकर, गिरीश एकतपुरे, संतोष इंगळे, अतुल जाधव, प्रदीप भोरे, पंकज भोरे, संजय जगदाळे, शुभम चव्हाण, अमरसिंह गायकवाड, तुषार जाधव, मनोज जाधव, भरतेश वैद्य, रमजान मुलाणी तसेच तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधवांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng