डोंबाळवाडी कुरबावी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन ग्राहकांना ताजा व स्वच्छ भाजीपाला मिळणार….

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते डोंबाळवाडी येथील श्रीनाथ मंदिर परिसरात बाजाराचा शुभारंभ…
कुरभावी (बारामती झटका)
डोंबाळवाडी कुरबावी ता. माळशिरस येथील श्रीनाथ मंदिर परिसरात आठवडा बाजार शुभारंभ गुरुवार दि. 21/09/2023 रोजी सायंकाळी 05 वाजता अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, उपसभापती मामासाहेब पांढरे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, संचालक ॲड. भानुदास राऊत, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, संचालक लक्ष्मणराव पवार, संचालक संदीप पाटील, संचालक लखन चव्हाण, संचालिका सौ. मेघाताई सचिन साळुंखे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब नाथासो रुपनवर पाटील, डोंबाळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वनिता सचिन आगवणे, उपसरपंच वर्षा सागर धायगुडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

नव्याने आठवडा बाजार सुरू होत असल्याने डोंबाळवाडी कुरबावी पंचक्रोशीतील अल्पभूधारक व छोटे शेतकरी यांच्या उत्पन्नात वाढ होऊन परिसरातील ग्राहकांना ताजे व स्वच्छ भाजीपाला मिळणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng