कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि संस्कार हीच ध्येयप्राप्तीची त्रिसूत्री – आ. राम सातपुते
सोलापूर (बारामती झटका)
उमाबाई श्राविका कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारोह कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले.
यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींनी नेहमी याची जाणीव ठेवावी की, कोणत्याही संकटाला न घाबरता, परिस्थितीशी न हरता संकटाशी जो सामना करतो तोच ध्येयापर्यंत पोहोचतो. तसेच आयुष्यात जगताना आपलं चारित्र्य चांगलं ठेवलं पाहिजे. आई-वडिल व स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. तसेच कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि संस्कार ही ध्येयप्राप्तीची त्रिसूत्री आहे, असे सांगितले. यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुकुमार मोहोळे यांनी केले तर प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. गणेश लेंगरे यांनी करून दिला. महाविद्यालयाचे वार्षिक अहवाल वाचन प्रा. प्रतिभा कंगळे यांनी केले तर क्रीडा अहवाल वाचन कल्याणप्पा हायगोंडे यांनी केले. शालेय बक्षीस यादी वाचन प्रा. अविनाश मुळकुटकर यांनी केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रा. सोमनाथ राऊत यांनी मानले. तर सूत्र संचालन प्रा. अर्चना कानडे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींचा शालेय व क्रीडा बक्षीसे देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य यतिराज होनमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी श्री. समर्थ बंडे, श्री. हर्षद निंबाळकर, उपप्राचार्या सौ. आश्विनी पंडित, पर्यवेक्षक श्री. बाळासाहेब पौळ, प्रा. ज्योती बांगर, प्रा. प्राजक्ता काळे यांची उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी व पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng